शेतकरी आंदोलकांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात हमी भावासाठी करणार आंदोलन
दिल्ली: नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन करत आहेत. ६ मार्चला या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहे. या दिवशी दिल्लीतील केएमपी एक्स्प्रेसवर ५ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा संयुक्त किसान मोर्चाचे योगेंद्र यादव यांनी केली आहे.
सकाळी ११ ते ४ असे पाच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर देशभरातील नागरिकांना आपल्या घरावर, कार्यालयावर काळे झेंडे लावण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे.
तसेच केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणा विरोधात १५ मार्च रोजी मजदूर संघटनाकडून देशभर रास्ता आणि रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
संयुक्त किसान मोर्चाचे वतीने सांगण्यात आले कि, केंद्र सरकार कडून हे आंदोलन संपविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकार मधील तीन मंत्र्यांना गाव बंदी करण्यात आलं आहे. तसेच ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून आंदोलन सांभाळणार आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात हमीभाव द्या मागणीसाठी ५ मार्च पासून आंदोलन करण्यात येईल अशी माहिती यादव यांनी यावेळी दिली.