मुंबईत होणाऱ्या IPL सामन्यांन बाबत मोठी घोषणा

मुंबई: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे मुंबईतील मैदानात आयपीएलचे सामने होणार की नाही. याबाबत चाहत्यांमध्ये धाकधुक लागली होती. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांबाबत मोठी घोषणा केली आहे.
मुंबईत ठरल्याप्रमाणेच आयपीएलच्या सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सामन्या दरम्यान कुठलेही अडथळे येणार नाही. असेही नवाब मलिक यांनी सांगितले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी ते सोमवार सायंकाळी ८ ते सकाळी ७ वाजे पर्यंत संचारबंदी असणार आहे. तर, शनिवारी व रविवारी लॉकडाऊन करणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे.
या बाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “निर्बंधासह सामन्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. स्टेडीयम मध्ये गर्दी होवू देणारं नाही. जो खेळाडू आयपीएलच्या सामन्यात भाग घेत असेल त्याने एकाच जागी राहावे. तेथे जास्ती गर्दी होणार नाही हे स्पष्ट झाल्यावरच आम्ही आयपीएल सामन्यांना परवानगी दिली असल्याचे मलिक यांनी सांगितले.”
IPL permission has been granted, matches to be played with restrictions. People are not allowed to sit in the stadium, only relays can be done. Players and others involved in IPL will be required to isolate themselves at the same place – Hon. @nawabmalikncp saheb.#IPL2021 pic.twitter.com/cjxxtPd1XL
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) April 5, 2021
“लसीकरणाची मागणी करणारे बरेच लोक आहेत, बीसीसीआयनेही खेळाडूंना लस देण्याची विनंती केली आहे. आम्हाला हे हि माहिती आहे की महाराष्ट्रात लोकांना या विषाणू पासून धोका आहे. आम्हाला वयाची मर्यादा देखील कमी करायची आहे जेणेकरून त्यांना आम्ही लस देवू शकतो, परंतु जोपर्यंत केंद्र सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही तसे करू शकत नसल्याचे नवाब यांनी सांगितले.”