भारतरत्न पुरस्कार नेमके कुणाच्या शिफारशींवर दिले जातात?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

काल भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले. भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. भाजपबरोबरच हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या मनसेने देखील राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच शेगाव येथे होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेचा ‘मनसे स्टाईल’ निषेध करण्यात येणार असल्याचे मनसे कडून सांगण्यात आले.

मात्र, या सगळ्या प्रकरणात गोची झाली ती महाविकासआघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची. उद्धव ठाकरेंनी केवळ आम्ही राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नाही अशी मवाळ प्रतिक्रिया दिली. सोबतच उद्धव ठाकरे यांनी ;सावरकरांबद्दल आमच्या मनात अतीव प्रेम निष्ठा आहेच पण ज्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांनी त्याग केला तेच स्वातंत्र्य आज अबाधित राखण्याची गरज आहे. असे म्हणत भाताची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वत्रंतलढ्यात तुमचे योगदान काय? असा सवाल विचारला होता.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी देखील केंद्रात आठ वर्षे सरकार सत्तेत असताना सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही असा प्रश्न केला आहे. राऊतांनी सावरकरांबरोबरच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना केंद्र सरकारने भारतरत्न द्यायला हवा अशी मागणी केली.

त्यामुळे नेमकी भारतरत्न देण्याची काय प्रोसेस असते ते आपण समजून घेऊ.

भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. १९५४साली केंद्र सरकारने भारतरत्न आणि पद्म विभूषण या पुरस्कारानं सुरवात केली. पद्मविभूषण पुरस्काराचे तीन प्रकार करण्यात आले. पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग असे वर्गीकरण करण्यात आले होते. मात्र, पुढे १९५५ मध्ये वर्गवारी रद्द करून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशी नावे देण्यात आली.

भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो?
कोणत्याही क्षेत्रात केलेल्या अच्युतम कामगिरीचा मग ते क्षेत्र राजकारण,कला, क्रीडा, विज्ञान,लेखन, समाजसेवा अशा अनेक क्षेत्रातील अति उच्च कामगिरीचा सन्मान म्हणून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो . भारतरत्न पुरस्कार कुणाला द्यायचा याची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात. राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारताच्या गणराज्यदिवशी म्हणजे २६ जानेवारी रोजी पुरस्कारांची घोषणा करण्यात येते .

पद्म पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्कारांच्या शिफारशी कोण करत ?
पद्म पुरस्कार देण्यासाठी तज्ञांची एक समिती नेमलेली असते. ही समिती पंतप्रधानाच्या नेतृत्वात गठीत केलेली असते. या समितीने नावांशी शिफारस केल्यावर पुरस्कार दिले जातात. पण, भारतरत्न पुरस्कारांची शिफारस देशाचे पंतप्रधान करत असतात हा बेसिक फरक पद्म आणि भारतरत्न या दोन पुरस्कारांच्या शिफारशींमध्ये असतो. थोडक्यात काय तर भारतरत्न कुणाला द्यायचा याचा सर्वस्वी निर्णय पंतप्रधानांच्या हातात आहे

त्यामुळे सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन केंद्र सरकारने त्यांचा सन्मान करावा असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *