पंढरपूर पोटनिवडणुकी पूर्वीच भाजपला धक्का ‘हा’ नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पंढरपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी तर्फे भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आल्याने आणखीनच चुरस वाढली आहे. भाजप कडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.
अशावेळी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे. ८ एप्रिल रोजी कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणारे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित हा प्रवेश होणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का मानण्यात येत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अशावेळी सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते कल्याणराव काळे भाजप सोडून जात असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा फायदा होणार आहे.
कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठ नाव आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी कॉंग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश केला होता.