|

रोजंदारीवरील मजुराची पत्नी बनली बंगालमध्ये भाजपची आमदार, TMCच्या ‘या’ मोठ्या उमेदवाराला पाडलं

became-the-wife-of-a-hired-laborer-bjp-mla-in-bengal-defeated-tmcs-this-big-candidate
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका काल पार पडल्या. रविवारी याचा सोक्ष मोक्ष लागला. यामध्ये भाजपच्या सालतोरा मतदारसंघातील उमदेवार चंदना बाऊरी यांचा विजय झाला आहे. चंदना बाऊरी यांनी तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार संदीप मंडल यांचा ४००० पेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, बाउरी तीन मुलांची आई असून तिच्याकडे फक्त ३१,९८५ ची संपत्ती आहे. बाउरी यांचे पती हे रोजंदारीचे मजूर आहे. ते दगडी बांधकाम म्हणून काम करतात. बौरी दाम्पत्याकडे तीन शेळ्या व तीन गायी आहेत.
मार्चमध्ये बाउरी यांनी वृत्तसंस्थेतील एएनआयला सांगितले की,’विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार म्हणून निवडले जाईल हे तिकिटांच्या घोषणेपूर्वी मला माहित नव्हते. बर्‍याच लोकांनी मला उमेदवारीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास प्रोत्साहित केले,परंतु मी हे यश संपादन करू शकेल असा विचार ही केला नव्हता.
सालतोरा मतदारसंघात गेल्या दोन वेळेस तृणमूल कॉंग्रेसचे स्वपन बारुई यांनी विजय मिळवला होता. यंदा तृणमूलनं संतोष मंडल यांना या मतदारसंघात संधी दिली होती. या विजयानंतर चंदना बाऊरी यांच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय.
कोण आहेत चंदना बाऊरी?
चंदना बाऊरी या ३ मुलांच्या आई आहेत. त्या आपल्या दोन मुली आणि एका मुलाला तिच्या आई आणि सासूकडे घरात ठेऊन निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर फिरत होत्या. बऱ्याच वेळा त्यांचे पती हे मजुरीच काम करून सुद्धा ते प्रचाराला जात होते. त्या २०१४ पासून भाजपा कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत. २०१८ च्या पंचायत निवडणुकीत त्या पहिल्यांदा ग्राम पंचायत सदस्य बनल्या होत्या. तर याशिवाय २०१९ मध्ये चंदना बाऊरी या बांकुरा जिल्हा समितीवर सदस्य झाल्या. त्यांच्या मते, भाजपात श्रीमंत अथवा गरीब असा कोणताही भेद नाही भाजपा सर्वांची आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *