खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी एकवटले
पुणे: देशभरातील लाखो बँकेचे कर्मचारी सोमवारी आणि मंगळवारी असे दोन दिवसाच्या संपावर गेले आहेत. हा संप सार्वजनिक बँकाचे खासगीकरणाच्या विरोधात आणि अजून काही मागण्यासाठी करण्यात येत आहे. या संपात ग्रामीण बँक सुद्धा सामील झाल्या आहेत.
या संपात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे १० लाख कर्मचारी गेल्या महिन्यापासून केंद्र सरकारच्या धोरणावर टिका करत आहेत. १५ आणि १६ मार्चला बँक युनियन कडून संपाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी, रविवारी देखील बँका बंद होत्या. यामुळे बँकाचे कामकाज ठप्प राहणार आहे.
या संपाचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होणार आहे. विविध शाखांमध्ये पैसे भरण्याचे काम, काढण्याचे काम चेक क्लीयरन्स, लोन मंजुरी अशी काम पूर्णवेळ बंद राहणार वाहे. ATM सेवा सुरु राहणार आहे. तसेच ऑनलाईन पर्याय उपलब्ध राहणार आहे.
संप का करण्यात येत आहे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात अर्थसंकल्प मांडला त्यात त्यांनी IDBI बँकेसह आणखी सरकारी बँकांचे खासगीकरणाची घोषणा केली होती. याच्या विरोधात बँक कर्मचारी आंदोलन करत आहे. या विरोधाची धार वाढण्याची शक्यता आहे.
या बँका राहणार सुरु-
- ICICI
- HDFC
- कोटक महिंद्रा
- इंडस बँक
आदी खासगी बँकाचे कामकाज सुरु आहे.