|

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक भूमिपूजन सोहळा आज;

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

विरोधीपक्षनेते यांना निमंत्रण नाही. भाजप आमदाराची सरकारवर टिका

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज (३१ मार्च ) पार पडणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील जुने महापौर निवासस्थानी हे स्मारक उभे राहणार आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे नियम पाळून मोजक्या उपस्थितांसह हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती औद्योगिक मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://twitter.com/MMRDAOfficial अथवा http://parthlive.com यावर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR,https://www.facebook.com/MahaDGIPR… तसेच सर्व जिल्हा माहिती कार्यालयांच्या ट्विटर आणि फेसबुकवरुन करण्यात येणार आहे.

दोन टप्प्यात स्मारक होणार

मुंबईचे महापौर यांच्या जुना निवासस्थानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. स्मारकाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलीत यंत्रणा उभारणी, इमारत सजावट, वाहनतळ, बगीचा तयार करणे आदी कामे पहिल्या टप्प्यात होणार आहेत.

विरोधी पक्षनेत्याला निमंत्रण नाही, आमदार नितेश राणे यांची सरकार वर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी टिका केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करून राजा होण्यासाठी मन मोठ लागत अशी टिका केली आहे.

“आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर… फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!” अशे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *