पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे शहरात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान यासाठी पोलिस दलाचे योगदान महत्वाचे आहे. मात्र आपले कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिसांना कोरोना विषाणूने घेरले आहे. दरम्यान आज शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे वयाच्या 51 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्याने शहरात पोलिस दलात शोकाकूल वातावरण तयार झाले आहे.
पुणे पोलिस दलात बाजीराव मोळे पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्यास होते. हल्ली त्यांची नेमणूक वाहतूक शोखत होती. त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यांना 10 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती. दरम्यान त्यांच्या शहरतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली बाजीराव मोळे यांच्या मृत्यू मुळे पुणे पोलिस दलात शोक व्यक्त केला जात आहे.