अबब! बाहुबलीची ६ कोटीची गाडी!

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली: एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार प्रभासने फारच कमी वेळात भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली आहे. प्रभासचे चित्रपट फक्त दक्षिण भारतातच नव्हे तर उत्तर भारतातही पाहिले जातात. घराघरात पोचलेला प्रभास अनेकांच्या गळ्यातल्या ताईत बनला आहे. देशाच्या सर्व भागात त्याचे चाहते आहेत.

आता प्रभासने नवी कार खरेदी केली असून तिची किंमत तब्बल सहा कोटी रुपये आहे. प्रभासने त्याचे वडील सूर्य नारायण राजू यांच्या वाढदिवसानिमित्त ही कार घेतली आहे. आज प्रभासचे वडील ती कार पाहण्यासाठी नाहीत. १२ फेब्रुवारी २०१० मध्ये प्रभासच्या वडिलांचे निधन झाले. मात्र प्रभासने त्यांच्या आठवणीमध्ये ही कार खरेदी केली आहे.ही कार चालवतानाचा प्रभासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रभासने लॅम्बोर्गिनी एवेनटेडर रोडस्टर ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत जवळपास सहा कोटी रुपये आहे. प्रभासच्या फॅन पेजने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर प्रभासचे कारसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. प्रभासने हैदराबादमध्ये ही कार चालवली असल्याचे देखील दिसत आहे.

लवकरच प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्याच्या ‘राधेश्याम’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात पूजा हेगडे दिसणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *