उमेश कामत आणि प्रिया बापटच्या चाहत्यांसाठी ‘बॅड न्यूज’

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: सोशल मीडियावर चाहत्यांना कपल गोल्स देणारे आणि सतत ॲक्टिव्ह असणारे उमेश कामत आणि प्रिया बापट.ही जोडी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवस चित्रीकरणामध्ये व्यस्त असणाऱ्या या जोडीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः उमेश कामत याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही धक्कादायक बातमी चाहत्यांना दिलीये.

उमेश आणि प्रिया यांच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग नुकतेच सुरु झाले होते. तसेच ते आगामी वेब सीरीजच्या चित्रीकरणात व्यस्त होते. ‘दुर्दैवाने माझी आणि प्रियाची कोरोन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या आम्ही घरात सेल्फ क्वारंटाईन आहोत. आवश्यक ती औषधे घेत आहोत आणि सावधगिरी देखील बाळगत आहोत. सगळ्या नियमांचेही पालन करत आहोत. मागील आठवड्यात जे कुणीही आमच्या संपर्कात आले असतील, त्यांनी देखील कोव्हिड चाचणी करुन घ्यावी किंवा स्वत:ला आयसोलेट करावे.’ अशा आशयाची एक पोस्ट उमेशने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रिया आणि उमेशने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय वेब सीरीजच्या दुसर्‍या सीझनसाठी एकत्र शूटिंग सुरू केली होती. याशिवाय ते ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या मराठी नाटकासाठी टूर करण्यात व्यस्त होते. या जोडप्याने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती आणि त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते  त्यालाही आता सात-आठ वर्ष झाली आहेत. त्यानंतर दोघेही एकत्र आले नव्हते. ‘दादा एक गुडन्यूज आहे’ हे नाटक प्रियाने निर्मित केले असून, उमेशची त्यात महत्त्वाची भूमिका आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *