दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी…
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड नुकताच पहिला वन डे सामना पार पडला. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला. ८ व्या ओव्हरदरम्यान श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. शार्दुल ठाकूनं टाकलेल्या चेंडूवर इंग्लंड फलंदाज जॉनी बेयरस्टोने जोरदार फलंदाजी केली. त्यावेळी चेंडू अडवताना श्रेयसच्या खांद्यामध्ये दुखापत झाली. खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयसला मैदानातून बाहेर जावं लागलं. हिटमॅन रोहित शर्मालाही दुखापत झाली.पहिल्या वन डे सामन्यादरम्यान झालेल्या या दुखापतीमुळे या दोघांनाही वन डे सीरिजमधून बाहेर जावं लागणार आहे त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. इतकच नाही तर आता वन डे सीरिजनंतर दिल्ली कॅपिटल्सलाही मोठा धक्का बसला आहे.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएल २०२१ च्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने नवी जर्सी लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दिल्लीच्या संघाने नव्या जर्सीचे अनावरण केले. आयपीएलची जोरदार तयार सुरु असतानाच दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आयपीएल २०२१ च्या चौदाव्या हंगामासाठी तो खेळू शकणार नाही. संपूर्ण आयपीएल होईपर्यंत श्रेयस अय्यर खेळणार नसल्याची माहिती मिळतीये.
दरम्यान, आयपीएल हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर दिल्लीचा पहिला सामना चेन्नईशी होणार आहे.