पाठदुखी ठरतेय जीवघेणी? त्यासाठी जाणून घ्या हे सोपे व्यायाम…

Back pain is fatal? Here's a simple exercise ...
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

आपल्या शरीराचा मुख्य आधार म्हणजे पाठीचा कणा! परंतू काहीजणांना ह्याच पाठीच्या गंभीर आजारांची समस्या असते. जी बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे समस्या उद्भवण्याची कारणं म्हणजे दुखापत, फ्रॅक्चर, खूप जड वस्तू उचलणे, वजन चुकीच्या पद्धतीने उचलणे, विचित्र हालचाली करणे, बसण्याची किंवा झोपण्याची पद्धत चुकीची असणे, तसेच वाढते वजन हे देखील एक गंभीर कारण आहे. तसेच काही संरचनात्मक समस्याही असू शकतात जशा कि संधिवात, डिस्क बल्ज, ऑस्टियोपोरोसिस इत्यादी शरीराची विशिष्ट ठेवण.

तसेच आपली रोजची जीवनशैली आणि कामकाज करण्याच्या पद्धती आणि ताणतणाव देखील पाठदुखीसाठी कारणीभूत आहे. कारण वाढते स्पर्धेचे युग, आणि खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या. कामानिमित्त ऑफिसमध्ये दिवसरात्र संगणका समोर बसून काम करावं लागतं, त्यात ऑफिस-घर अशी धावपळ होणे. बस किंवा ट्रेननं प्रवास करताना तासन् तास उभं राहून प्रवास होतो. हा प्रवास करताना पाठीवर असलेल्या बॅगेमुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. बऱ्याचदा आपण चुकीचं झोपतो, ताठ बसत नाही, बरीचशी कामं बसूनच करतो. परिणामी, बदललेल्या जीवनशैलीमुळे आपण स्वतःच आपल्या या पाठीच्या दुखण्याला आमंत्रण देतो.

पाठीची निगा राखण्यासाठी काही उपाय-

  • वजनवाढी वर नियंत्रण ठेवा.
  • शारीरिकदृष्टया बळकट होण्यासाठी नियमित व्यायाम करा.
  • झोपताना शक्य असल्यास उशीचा वापर टाळा आणि पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा.
  • दिवसरात्र ऑफिशियल कामकाज करतांना पाठीला आरामदायक असणाऱ्या खुर्चीचा वापर करा.
  • अभ्यासाला किंवा कामाला बसताना किंवा चालताना पाठीचा कणा ताठ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
  • सलग खूप वेळ बसणं टाळा. स्नायूंची हालचाल होण्यासाठी अधून-मधून विश्रांती घ्या किंवा शतपावली करत जा.
  • उंच टाचांच्या (हिल्सच्या) चपला, बूट वापरणं टाळा.
  • पाठदुखी घालवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे, योगासन, व्यायाम, चालणे, पळणे इत्यादी उपक्रम रोज करावे.
  • ‘ड’ जीवनसत्त्व तसंच कॅल्शिअमच्या कमतरतेमुळेही पाठ दुखीचा त्रास निर्माण होतो. कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे.

पाठदुखीसाठी योगासनं हा रामबाण उपाय मानला जातो. तुमची पाठदुखी दिर्घकालीन नसली तरी वरील उपाय आणि योगासने तुम्हाला फायद्याचे ठरू शकते. पाठीचे स्नायू सक्षम करण्यासाठी तुम्हाला फक्त रोज १० / १५ मिनिटे साधी सरळ आणि सोपी योगासने करण्यासाठी खर्च करावी लागणार आहेत. चुकीच्या पद्धतीने ही आसने तुम्ही जर केलीत तर त्याचे वाईट परिणाम भोगायला लागतील. पाठीचे दुखणे आणखीन वाढेल. ज्या स्त्रीया गरोदर असतील तर त्या स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भारपणात या आसनांचा सराव करू नये. पाठ दुखी हे गरोदरपणाचे एक लक्षण आहे.

भुजंगासन

भुजंगासनामुळे शारीरिक तणाव दूर होतो त्यामुळे  कंबर आणि पाठदुखीतून आराम मिळतो. वजन वाढल्यानंही पाठ दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. पोटावरील चरबी घटवण्यासाठी भुजंगासन लाभदायक आहे. सुरुवातीला काही दिवस स्नायूदुखी होऊ शकते. परंतु तुम्हाला हर्निया आणि अल्सरचा त्रास असेल तर भुजंगासन करू नये. तसेच गर्भवती महिला, तीव्र गुडघे दुखीचा त्रास असणाऱ्यांनी आसन करू नये.

पवनमुक्तासन

या योगासनाच्या सरावामुळे निंतब (Hips), कंबर, पाय आणि या अवयवांमधील स्नायू ताणले जातात. आणि सोबत कमरेखाली भागात होणाऱ्या वेदनांपासूनही सुटका होऊ शकते. पवनमुक्तासनामुळे तणाव देखील कमी होते. पोटाचे आजार, तीव्र गुडघे दुखी किंवा पाय दुखी, कंबर, मान तसंच पाठीमध्ये तीव्र वेदना असल्यास पवनमुक्तासन करणं टाळावं.

बद्धकोनासन

बद्धकोनासनास इंग्रजीमध्ये बटरफ्लाय पोझ असंही म्हणतात. पाठीच्या कण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर असते. मात्र ज्यांना गुडघ्यांध्ये दुखापत, वेदना होतात त्यांनी बद्धकोनासन करू नये. तसेच सायटिकाचा त्रास असणाऱ्या योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन करावे.

मार्जरासन

मार्जरासनास इंग्रजीमध्ये कॅट (Cat) पोझ म्हणतात, मांजरीच्या उभे राहण्याच्या प्रमाणेच ही पोज आहे. यामध्ये मार्जरासन ‘अ’, मार्जरासन ‘ब’ आणि त्रिपाद मार्जरासन असे प्रकार आहेत. मार्जरासनाच्या सरावामुळे पाठीचा कणा अधिक बळकट होतो. मुख्यतः पाठीच्या दुखण्यातून सुटका मिळते. या आसनामुळे पाठीच्या कण्यासह अन्य अवयवांमध्ये लवचिकता निर्माण होते. परंतू मनगट, हात, पाय, मान, गुडघ्यांमध्ये वेदना होत असल्यास आसन करू नये.

शलभासन

शलभासनामुळे पाठ नितंब (Hips), हात आणि पायांच्या स्नायूपेशी बळकट होण्यास मदत होते. तसंच पाठीचा कणा, छाती, खांदे आणि मांड्यांच्या स्नायूपेशी उत्तम प्रकारे ताणल्या जातात. पाठ दुखी असणाऱ्यांनी हे शलभासन नक्कीच करावे. हृदय रोग असणाऱ्यांनी आसन करू नये. मानेच्या समस्या किंवा तीव्र वेदना होत असल्यास आसन करणं टाळावे. महत्वाचं म्हणजे थायरॉइड असणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये. पाठ दुखीचा त्रास असल्यास  त्यावर महागडी औषधोपचार पद्धती करण्यापेक्षा त्यास अनुसरून योगासने करावीत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *