आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय केला जाहीर ; भूमिका तडीस नेणार का ?

जितेंद्र आव्हाड
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

चित्रपटगृहात जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाडांना अटक करण्यात आली होती. एक रात्र तुरुंगात काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला होता.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल कळवा मधल्या एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय.

त्यावरून मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय. त्या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय की, आव्हाड यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने दोन्ही खांद्यास दाबून काय उभी आहे, बाजूला हो असं म्हणत ढकललं.

त्यानंतर संतापलेल्या आव्हाडांनी तसंच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलंय. ट्विट करत आव्हाड म्हणाले की, पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४. मी या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.

आव्हाडांच्या या ट्विटनंतर खळबळ उडाली असून त्यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. ते ही भूमिका तडीस नेतील का ? राष्ट्रवादीच्या गोठातून आव्हाडांच्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया येईल ? हे ही पाहणं महत्वाचं ठरेल.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *