शुक्रवारच्या नमाजामध्ये होणार हुंड्याविरोधात जनजागृती
पुणे: गुजरात मधील अहमदाबाद येथे एका मुस्लिम महिलेने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. यानंतर हुंडा, पैसे, वस्तूसाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मुस्लिम समाजातून आवाज उठविण्यात येत आहे.
आयेशा असे २३ वर्षीय महिलेचे नाव आहे. हुंड्यासाठी तिचा नवरा त्रास देत होता. त्यामुळे तिने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर हुंड्या बाबत मुस्लिम समाजात आवाज उठविण्यात येत आहे.
पुण्यातील इस्लाम-ए-मुआशरा कमिटीने याबाबत पुढाकार घेतला असून शुक्रवारी होणाऱ्या नमाजमध्ये प्रवचनात कमीत-कमी खर्चात लग्न करणे, त्यामध्ये अनावश्यक खर्च टाळण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे.
मुस्लिम समाजात वधू पित्याकडून भेटवस्तू मागणे, हुंडा घेणे आदीसह विनाकारण खर्च करण्यास भाग पाडण्यात येत आहे. हे टाळण्यासाठी समाजात जनजागृती करणे आवशक असून राज्यातील सर्व मस्जीदिंमध्ये इमामांनी किमान तीन शुक्रवारच्या नमाजमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवचनात याविषयी जनजागृती करण्याचा सूचना इस्लाम-ए-मुआशरा कमिटीने इंडियन मुस्लिम पर्सनल लों बोर्ड आणि राज्यातील मौलानांची ओनलाइन बैठक झाली. या बैठकीला मालेगाव येथून मौलाना अब्दुल हमीद, उमरेज मैफुन रहेमानी, ऑल इंडिया मुस्लिम लों बोर्डाचे सदस्य मौलाना निज्मोद्दिन फाखरोद्दिन, मुफ्ती महुजोद्दीन कासमी, मुफ्ती अब्दुल हमीद यांच्या सह मुंबई, सांगली कराड आदी शहरातून मौलाना सहभागी झाले होते. मुस्लिम समाजात लग्नाविषयी नियम घालून देण्यात आले आहे. मात्र, अनेकांनकडून त्याला बगल देण्यात आली आहे. यामुळे लग्नातील खर्च वाढत आहे. परिणामी अनेक मुली लग्नाविना आहेत. वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न कसे करावे, याची चिंता सतावत आहे. लग्नानंतर पत्नीला वडिलांकडून पैसे इतर वस्तू आणण्याची मागणी केली जात आहे. त्याविरोधात राज्यातील सर्व मस्जीदिंमध्ये शुक्रवारच्या नमाजमध्ये होणाऱ्या प्रवचनात कमीत-कमी खर्चात लग्न करणे, त्यामध्ये अनावश्यक खर्च टाळण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे.