|

दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हमला

attack on rakesh tikait
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भाजपकडून हल्ला – राजेश टिकैत यांचा आरोप

राजस्थान: केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्याचे नेते राकेश टिकैत यांच्यावर राजस्थान मध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

            अलवरच्या हरसौरा भागातील एका सभेला संबोधित केल्यानंतर राकेश टिकैत बानसूरकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर काही अज्ञात हल्लेखोरा कडून दगडफेक करण्यात आली आहे.

या दगडफेकीत त्याच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. त्याच बरोबर टिकैत यांच्यावर काही जणांनी शाई फेकली आहे. मात्र पोलिसांनी वेळेतच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत राकेश टिकैत यांना बाहेर काढले.

हा हल्ला भाजपकडून करण्यात आला आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. ही लोकशाहीची हत्या करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बानसूर भागातही या घटनेचे   पडसाद उमटले आहे. शेतकरी नेत्यांनी ‘इट का जवाब पत्थरसे देंगे’ असे नारे दिले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *