नांदेड मध्ये पोलिसांवर शीख समुदायाचा हल्ला
४ पोलिस कर्मचारी जखमी
नांदेड: नांदेडच्या सचखंड श्री हुजुर साहेब गुरुद्वाराच्या परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना सोमवारी घडली. कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड जिल्ह्यात ४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे होळी नंतर निघणाऱ्या शीख समाजाच्या होला मोहल्ला मिरवणुकीला परवानगी नाकारली होती.
मात्र, काही जणांनी पोलिसांनी केलेली बॅरेकेटींग तोडली आणि पोलिसांवर हल्ला केला. यामुळे काही वेळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता. नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी या हल्ल्यात ४ पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगितले. होला मोहल्ला कार्यक्रम ला शीख धर्मियान मध्ये विशेष महत्व आहे. हे पाहण्यासाठी देश विदेशातून नांदेड येथे नागरिक येत असतात.
वाढत्या कोरोना रूग्ना मुळे हल्ला मोहल्लाला परवानगी नाकारली होती. त्याबाबत गुरुद्वारा प्रबंधक समितीला सूचना केल्या होत्या. तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम गुरुद्वारा मध्ये करू असच आश्वासन दिले होते. पण सायंकाळी ४ वाजल्यानंतर निशाण साहिब गुरुद्वारा बाहेर आणलं. तेव्हा ३०० ते ४०० तरुणांनी बॅरीकेट तोडण्याचे प्रमोद कुमार शेवाळे यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या वतीने सांगण्यात आले की, यंदा होला मोहल्ला कार्यक्रम गुरुद्वारा मध्ये आयोजित करायचं ठरलं होत. सध्या नांदेड जिल्ह्यात लॉक डाउन असल्याने आम्ही हा निर्णय घेतला होता. यात मिरवणूक काढण्यात येणार नव्हती. तस आम्ही सगळ्यांना सूचना दिल्या होय. वरिष्ठांना सुद्धा वेळोवेळी कळविले होते. पण कार्यक्रमासाठी आलेल्या तरुण वर्गाने वरिष्ठांचे ऐकले नाही. निशाण साहिब जसा गेट जवळ आला बॅरीकेट तोडले आणि महविकर चौकाकडे धाव घेतली अशी माहिती गुरुद्वारा सुरक्षा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.