Tuesday, October 4, 2022
Homeमत-मतांतरेएखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता येताच, पुरोगामी मंडळींना हायसे का वाटते ?

एखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता येताच, पुरोगामी मंडळींना हायसे का वाटते ?

बिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा रंग बदलले नि महाराष्ट्राच्या राजकारणापाठोपाठ बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली खरी ; पण तोवर भाजपच्या हातून बिहार निसटले.

७ ऑगस्टला नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीश कुमार यांच्यात संवाद झाला होता. पुढे दोनच दिवसात नितीश कुमार यांनी भाजपासून काडीमोड करण्याचा फैसला केला.

एवढेच काय तर महाआघाडीत सामील होताच २०२१ नरेंद्र मोदी सत्तेवर नसतील, असा दावा नितीश बाबूंनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे नितीश कुमार २०२४ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे येऊ पाहत असल्याचा संदेश गेला.

२०१३ मध्ये पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव घोषित होताच नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडली होती. आताही त्यांनी एनडीएतुन बाहेर पडताच २०२४ मध्ये मोदींना सत्तेवरून खेचणार असल्याचा दावा केला आहे.

कमी संख्याबळ असताना मुख्यमंत्री करूनही भाजप आपला पक्ष संपवत असल्याचा आरोप करत नितीश कुमार यांनी डाव्यांच्या साथीने नवे सरकार स्थापन केले. मात्र, बिहारच्या सत्तेची नवी समीकरणे जुळवताच त्यांनी दिल्लीच्या राजकारणाव मोठे भाष्य करून मोदीविरोधी मंडळींना टॉनिक दिले.

एखाद्या राज्यात गैरभाजप सरकार येताच पुरोगामी मंडळीना दिलासा मिळतो

२०१९ मध्ये भाजपची साथ सोडून कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे भाजपला टक्कर दिली जाऊ शकते, असा संदेश महाराष्ट्राने दिल्लीला दिला.

पुढे उद्धव ठाकरे यांनी भाजपला व त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येला दिलेली टक्कर पाहून देशभरातील पुरोगामी मंडळींना एक हिरो मिळाला. मात्र, उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून खाली खेचले असताच नितीश बाबूंना भाजपला धक्का देत पुरोगामी मंडळीच्या ओशाळलेल्या आशावादाला नवसंजीवनी दिली.

केजरीवाल, ममता ते नितीश कुमार

देशात सक्षम विरोधी पक्ष नाहीत, अशातला भाग नाही. मात्र, विरोधकांमध्ये एकतेची वानवा असल्याने भाजपला टक्कर देणे विरोधकांना जमत नाही. त्यामुळे एखाद्या राज्यात भाजपचा पराभव होताच पुरोगामी मंडळी भाजपचा पराभव करणाऱ्या व्यक्तीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पाहते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते भविष्यात देशाचे नेतृत्व करतील, असे दावे केले जाऊ लागले होते. मात्र, सरकार स्थापनेला अडीच वर्ष होत असतानाच भाजपने उद्धव ठाकरे यांची सत्ता आणि पक्ष दोन्हीवर संकट आणले.

मागच्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करतील, असे बोलले जायचे. मात्र, येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतच उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इथे सत्ता राखता आली नाही, तर त्यांना कसोटीचा काळ सोसावा लागेल.

एकीकडे उद्धव ठाकरे यांची सत्ता भाजपने खेचली तर दुसरीकडे नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेतून बेदखल केले. यामुळे मोदीविरोधी मंडळी आता नितीश बाबुंकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतच्या अनुषंगाने आशेने पाहू लागली आहे.

पण एखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता आली की पुरोगामी मंडळींना हायसे का वाटते? हा खरा प्रश्न आहे.

२०१५ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव करून मोदी लाटेला न जुमानता सत्ता मिळविली. त्यामुळे मोदी विरोधकांना केजरीवाल यांच्यात हिरो दिसला.

पुढे २०१८ मध्ये राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश मध्ये कॉंग्रस व डाव्या पक्षांची सरकारे आल्यानंतर आता मोदी युग संपल्याचा दावा विरोधकांनी केला. या तीनही राज्यात कॉंग्रेसला मिळालेल्या यशाच्या अनुमानानुसार कॉंग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत करिष्मा करणार, अशी शक्यता वर्तवली गेली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एकत्र असल्याचा भास निर्माण केला. पण विरोधकांची आपापसातील झुंज त्यांच्या निकालावर परिणामकारक ठरली. आणि पुन्हा मोदी सत्तेवर आले.

मोदींचे दुसरे पर्व सुरु झाल्याने मोदी विरोधी मंडळी जरा निराश झाली. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने पुरोगामी मंडळी पुन्हा प्रफुल्लीत झाली. त्यानंतर २०२० मध्ये केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा दिल्ली काबीज केली. मग पुरोगामी मंडळीने पुन्हा केजरीवालांना हिरोच्या नजरेने पाहायला सुरुवात केली.

२०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बनर्जी यांनी वाघिणीप्रमाणे भाजपशी झुंजून सत्तेचे मयूरसिंहासन आपल्याकडेच ठेवले. तसेच गोवा व आसाममध्येही तृणमूलने पाय रोवायला सुरुवात केली. ममता यांच्या विजयाने मोदी विरोधी पुरोगामी मंडळींचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला.

त्या पाठोपाठ केजरीवाल यांनी पंजाबमध्ये कॉंग्रेस, भाजप व अकाली दल या तीनही पक्षांना मात देत नवा सत्तेचा सारीपाट मांडला. त्यातच केजारीवाल यांनी मिशन गुजरात, उत्तराखंड सुरु केले.

कॉंग्रेस कमजोर तर गैरकाँग्रेसी मजबूत

एकीकडे पंजाबमध्ये केजरीवाल यांना मिळालेले बहुमत मिळविले. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये योगींना डाव्या पक्षांचा केलेला सुपडा साफ केला. कॉंग्रेस मात्र, आपले अस्तित्व राखता-राखता गुंडाळली गेली.

मागच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची वाताहत व गैरकाँग्रेसी भाजपविरोधी पक्षांचा विजय हे समीकरण ठळक दिसून आले. गैरकाँग्रेसी भाजपविरोधी पक्षांच्या विजयाचा जल्लोष करीत असताना पुरोगामी मंडळींना कॉंग्रेसची बिकट अवस्था विसरता आली नाही, हे ही तितकेच खरे.

राजस्थान, दिल्ली, छत्तीसगड, केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब आणि आता बिहारमध्ये भाजपविरोधी पक्षांची सरकारे आल्याने पुरोगामी मंडळी जरा सुखावली असून २०२४ मध्ये विरोधक काहीतरी जादू करतील, असा त्यांना विश्वास आहे.

एकेक राज्यात गैरभाजप सरकारे यावीत आणि विरोधक भक्कम व्हावेत, अशी या मंडळींची धारणा आहे. त्यामुळेच एखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता आली की पुरोगामी मंडळींना हायसे वाटत असावे, एवढ्याच कारणासाठी ते सुखावणे वगैरे..

अधिक वाचा :

आनंद दिघेंनंतर सर्वात जास्त काळ जिल्हा प्रमुख पदी राहण्याचा रेकॉर्ड अंबादास दानवे यांनी केलाय..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments