आर्ची दिसणार ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: सैराट चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरु हीने अल्पवधीतच रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असून ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. नुकतच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे सेटवरील फोटो शेअर करत तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केल्याचे सांगितले होते. रिंकू बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे.

रिंकू ही सध्या दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे. या प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत अमोल पालेकर दिसणार आहेत. सार्थक दासगुप्ता यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर रिंकू राजगुरुचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती कोर्टात बसलेली दिसते आहे. यासोबतच त्यांनी अमोल पालेकर सोबतचा फोटोही शेअर केला आहे त्यात अमोल पालेकर यांचा गेटअप पाहून ते वकिलांची भूमिका साकारत असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता या चित्रपटात रिंकू कोणत्या भूमिकेत झळकेल हे लवकरच पाहायला मिळणार आहे. रिंकू राजगुरूचा नुकताच अॅमेझॉन प्राइमवर अनपौज्ड (Unpaused)  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याशिवाय रिंकूने नुकतच लंडनमध्ये तिच्या आगामी चित्रपट छूमंतरचे शूटिंगपूर्ण केले आहे. या चित्रपटात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *