|

सनरायझर्स हैदराबाद टीमच्या कर्णधार पदी ‘या’ खेळाडूची नियुक्ती

Appointment of 'Ya' player as captain of Sunrisers Hyderabad team
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : सध्या IPLच्या २०२१च्या हंगामाला चांगलीच रंगत आली आहे. अश्यातच सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. आता पर्यंत या टीमचा कर्णधार डेविड वाॅर्नर होता मात्र आता केन विल्यमसनला कर्णधारपद दिले आहे. या पुढच्या सर्व सामन्यांसाठी केन हा कर्णधार असेल. या संदर्भात सनरायझर्स हैदराबादने ट्विटर च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
त्यामुळे उद्याचा आणि तसेच पुढे येणाऱ्या सर्व सामन्यांसाठी केन विल्यमसन हा सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असणार आहे. सनरायझर्सचा उद्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना पार पडणार आहे. त्याच प्रमाणे ओव्हरसीज कॉम्बिनेशनची जागा बदलण्याचा निर्णयही संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. मागच्या हंगामात वाॅर्नरचा देखील चांगलाच प्रभाव आपण पहिला होता. तसेच सामन्यांमध्ये वाॅर्नर मैदानाच्या आत आणि बाहेर संघाला पाठींबा देत राहील”, असे हैदरबादने ट्वीट च्या माध्यमातून सांगितले आहे.
आता पर्यंतची कामगिरी बघता हैदराबाद संघाने एकच विजय मिळवला आहे. यंदाच्या मौसमात आतापर्यंत त्यांची कामगिरी ही निराशाजनक होती. त्यांनी आतापर्यंत ६ सामने खेळले आहे. तसेच पॉईंट टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद सर्वात खाली आहे. संघात सामूहिक कामगिरीचा अभाव असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *