Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचाकेंद्रीय वने व पर्यावरण समितीवर पद्मश्री पोपटराव पवार यांची नियुक्ती

केंद्रीय वने व पर्यावरण समितीवर पद्मश्री पोपटराव पवार यांची नियुक्ती

नगर: भारत सरकारच्या वने व पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीवर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे .

वनमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असून त्यात सामाजिक पर्यावरण, उद्योग तसेच इतर क्षेत्रातील मिळून ११ सदस्यांची समिती आहे. सदर समितीमार्फत पड जमीनी वनाच्छादीत करणे, जंगलतोड थांबविणे, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात हरितपट्टे निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्टे आहेत. यात शाळा, महाविद्यालये, उद्योगक्षेत्र, आजी, माजी सैनिक संघटना, खाजगी स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या सहकार्यातून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन व जनजागृती यावर काम केले जाणार आहे. केंद्रीय वने व पर्यावरण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

जानेवारी महिन्यात खासदारांना केले होते मार्गदर्शन
मागील महिन्यात हिवरेबाजार येथील पाणी व पिकांचे नियोजन, जलसंधारण, पर्यावरण, स्वच्छता आदी क्षेत्रांतील अभ्यासपूर्ण माहिती पोपटराव पवार यांनी खासदारांना दिली आहे. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार हे गाव जगाच्या नकाशावर नेले. जलसंधारणाच्या कामात आदर्श निर्माण झाल्याने देशभरातील अधिकारी, ग्रामस्थ हिवरेबाजारला भेट देऊन पवार यांचे मार्गदर्शन घेतात. आता खासदारांना देखील आपल्या कामाची माहिती त्यांनी दिलेली आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments