| |

अपर्णा यादव भाजपमध्ये ; एकेकाळी मेनका गांधी यांनाही भाजपने असेच दिले होते बळ

अपर्णा यादव
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली : आगामी पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. येत्या १० फेब्रुवारीपासून मतदान सुरु होणार असून १० मार्च रोजी निकाल जाहीर होईल.

आगामी काळात होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा मणीपूर या राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात असून येत्या काळात सत्ता राखून ठेवण्याचे आव्हान भाजपला असणार आहे.

तर पंजाबमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच भाजपसाठी टार्गेट असेल. पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपचे सरकार असल्याने निश्चितच भाजप विरुद्ध इतर विरोधक अशी निवडणूक होईल.

खऱ्या अर्थाने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांच्या निवडणुका भाजपसाठी अधिक महत्वपूर्ण असणार आहेत. त्यातही उत्तरप्रदेश भाजपसाठी अधिक महत्वाचे असणार आहे.

भाजप नेते पुन्हा सत्तेत दावा करत ३०० पेक्षा जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत आहे. तसेच उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर करायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षात इनकमिंग-आउटगोइंग सुरु आहे.

दरम्यान, आज भाजपला समाजवादी पक्षाला मोठा धक्का देण्यात यश आले आहे. मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मागच्या भाजपच्या काही नेत्यांनी सपामध्ये प्रवेश करत भाजपचे टेन्शन वाढवले असतनाच भाजपकडून यादव परिवारातील सदस्यास पक्षात घेत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

अपर्णा यादव यांनी आज सकाळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करत ‘मी पहिल्यापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने खूप प्रभावित झाले आहे,’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

उत्तरप्रदेशच्या राजकारणाचे वर्णन करायचे झाले तर यादव कुटुंबाला वगळता येणार आहे. या परिवाराचे उत्तरप्रदेशच्या राजकारणात मोठे वजन आहे. पण भाजप यादव परिवारातील व्यक्तीस पक्षात घेऊन यादव विरुद्ध यादव अशी लढाई उभी करू पाहत आहे.

मागच्या दोन दशकांपूर्वी कॉंग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपने गांधी विरुद्ध गांधी लढाई उभी करण्यासाठी मेनका गांधी आणि त्यांचे पुत्र वरून गांधी यांना बळ दिले होते. संजय गांधींचे अपघाती निधन झाल्यांनतर थोड्याच दिवसात मेनका गांधी यांनी सासू इंदिरा गांधींशी बिमोड करत गांधी घरातून बाहेर पडल्या.

त्यांनतर २००४ मध्ये पुत्र वरून सोबत भाजपात प्रवेश केला होता. विशेष म्हणजे, त्याकाळी उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे वर्चस्व मोडीत काढणे हे, भाजपचे धोरण होते.
आताही उत्तरप्रदेशात यादव परिवाराला तगडे आव्हान देण्याच्या तयारीचा एक हिस्सा म्हणूनच अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशाकडे पहिले जात आहे.

अपर्णा यादव यांना लखनौच्या कँट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्या याच मनातदार संघातून लढल्या होत्या. पण त्यांना पराभव पचवावा लागला होता.

यावेळी देखील अपर्णा यादव कँट याच मातदारसंघातून लढण्यास इच्छुक होत्या. पण सपाकडून तिकीट मिळणार नसल्याचे निश्चित होताच त्यांनी भाजपात प्रवेश केला.

ताज्या बातम्या –

पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन असल्याचे सिद्ध – चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ मुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग वाढणार!

नगर पंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चपराक लगावली – जयंत पाटील


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *