अन्वय नाईक आणि टीआरपी घोटाळा बाहेर काढल्याने सचिन वाझे हे लक्ष
अंबानीच्या जीवना एवढीच सामन्यांची किंमत
मुंबई: सचिन वाझे हे उत्तम तपास अधिकारी आहेत. अन्वय नाईक आणि टीआरपी घोटाळ्यातील आरोपींना पकडून त्यांनी जेल मध्ये पाठविल्याने त्यांच्यावर राग व्यक्त करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर बुधवारी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांच मधून बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले होते. सचिन वाझे यांना हिरेन मृत्यू प्रकरणात अटक करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती. यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
सभागृहात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर कडाडून टिका केली होती. पत्रकार अर्णब गोस्वामीला अटक केल्याने वाझे विरोधात बोलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, अंबानीच्या जीवा एवढीच सामन्य आणि आंदोलकांच्या जीवाची किमत असल्याचे त्यांनी सांगितले. मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र पोलीस तपास करत आहे. महाराष्ट्र पोलीस कुठलेही प्रकरण दाबत नाही. हे विरोधी पक्ष नेते यांना चांगले माहित आहे.
मंत्र्याचा राजीनामा घेणे, अधिकाऱ्यांची बदली करणे एवढेच विरोधी पक्षाचे काम आहे का? तुम्हाला यातच समाधान असेल तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाला समजले नाही. एका बदली मुळे मनसुख हिरेन यांच्या पत्नीला न्याय मिळणार आहे का तर असे नाही. अत्यंत चांगले तपास अधिकारी आहेत. त्यांनी अन्वय नाईक आणि टीआरपी घोटाळ्यात हात घातला आणि आरोपींना जेल मध्ये पाठविले. यावरूनच त्यांना लक्ष करण्यात येत असल्याचे राऊत यांनी सांगितले. तुमच्या कडे काही पुरावे असतील तर ते सरकारला द्यावेत. विरोधी पक्ष नेते खोट बोलत नसतील असे मला वाटते. त्यांच्याकडे असणारे पुरावे सरकारला द्यावे. अंबानीच्या जीवनाची जेवढी किमत आहे तेवढी सामान्यांच्या जीवनाची किमत असल्याचे राऊत यांनी सांगितले