मनसुख हिरेन प्रकरणात अजुन एका अधिकाऱ्याला अटक

मुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. सुनील माने असे अटक करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ही अटक केली आहे. माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सद्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
दहशतवादी विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर NIA कडे हा तपास देण्यात आला असून माने यांना अटक करण्यात आली आहे.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमला हिरेन यांनी दावा केला होता की, आपल्या पतीला कांदिवली पोलिस ठाण्यातून फोन आला होता. आणि चौकशीला बोलावलं होत. अस त्यांनी सांगितलं होत.