|

स्पोर्ट्स बायोपिकच्या पठडीत आणखी एक प्रेरक कथा सामिल

Another inspiring story added to the backdrop of a sports biopic
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: बॉलीवूडने अनेक खेळाडूंना बायोपिकच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. क्रीडाप्रेमी प्रेक्षक स्पोर्ट्स बायोपिक अक्षरशः डोक्यावर घेतात. गेल्या वर्षापासून चर्चेत असलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बयोपिकचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यात अभिनेत्री परिणीती चोपड़ा सायनाचा रोल करणार आहे.     

मुला-मुलींमध्ये भेदभाव करण्याच्या वृत्तीवर हा टीझरने भाष्य केले आहे. सायनाने या मानसिकतेला हरवण्यासाठी ज्या जिद्दीने संघर्ष केला त्याचा प्रत्यय देखील आपल्याला येतो. अमोल गुप्ते यांनी ‘सायना’चे दिग्दर्शन केले आहे. हा बयोपिक २६ मार्चला रिलीज होणार आहे. अभिनेता मानव कौल याने सायनाचे प्रशिक्षक पुलैला गोपीचंद यांची भूमिका साकारली आहे.

बॉलीवूड मध्ये तयार झालेले १० स्पोर्ट्स बयोपिकवर एक दृष्टीक्षेप:

एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी

नीरज पांडे दिग्दर्शित एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी २०१७ मध्ये प्रदर्शित झाला. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची भुमिका अभिनेता सुशांत सुशांतसिंह राजपूत याने साकारली आहे.  या बयोपिक मध्ये धोनीचं बालपण ते २०११ सालचा विश्वचषक विजय, इथपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

मेरी कॉम

भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉमचा प्रवास उलगडणारा हा बयोपिक २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. ओमंग कुमार यांनी या बायोपिकचे दिग्दर्शन केले असून प्रियंका चोपड़ाने यामध्ये मेरी कॉमची भूमिका साकारलली होती. चित्रपटाला उदंड प्रतिसाद तर मिळालाच पण त्याचबरोबर प्रियांकाच्या अभिनयाची चांगलीच तारीफ झाली. 

दंगल

नितेश तिवारी दिग्दर्शित दंगल हा बयोपिक २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. हरियाणाचे पैलवान महावीरसिंग फोगाट यांनी गीता आणि बबिता फोगाट या त्यांच्या मुलींची ऑलिम्पिक्स साठी करून घेतलेली तयारी या चित्रपटात दाखवली आहे. या सिनेमात अमिर खान, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते. भारतात तसेच परदेशातही दंगलला भरघोस प्रतिसाद मिळाला.

भाग मिल्खा भाग

धावपटू मिल्खा सिंग यांनी भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून दिले होते. भाग मिल्खा भाग हा बयोपिक २०१३ मध्ये प्रदर्शित झाला. फरहान अख्तरने यात मुख्य भुमिका साकारली होती. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या सिनेमातून प्रचंड प्रोत्साहन मिळत असल्याचा अभिप्राय प्रेक्षकांनी दिला होता.  

चक दे इंडिया

२००७ मध्ये प्रदर्शित झालेला चक दे इंडियाचे दिग्दर्शन शिमित अमीन यांनी केले होते. यामध्ये शाहरुख खानने महिला हॉकी टीमच्या प्रशिक्षक मीररंजन नेगी यांची भूमिका साकारली होते. सूरज लता देवी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय हॉकी टीमने २००२ कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ही प्रेरक कथा चक दे इंडिया मध्ये मांडण्यात आली आहे.

‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा जीवन प्रवास ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’च्या माध्यमातून २०१७ मध्ये पडद्यावर आला होता. जेम्स एर्स्किन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात सचिन स्वतःच त्याच्या आयुष्याची गोष्ट प्रेक्षकांना सांगतो. इतर बायोपिक्स मध्ये विशिष्ट खेळाडूची व्यक्तिरेखा एखाद्या अभिनेत्याने केली होती. पण हा बयोपिक डॉक्युमेंट्रीच्या मांडणीत सादर करण्यात आला असून डॉक्युड्रामा’च्या पठडीत उलगडतो. सचिन च्या चाहत्यांसाठी हा सिनेमा एक पर्वणीच आहे.

सूरमा

शाद अली दिग्दर्शित सूरमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. हॉकीपटू संदीप सिंगच्या कारकिर्दीतील आलेली आव्हाने आणि यशाभोवती या सिनेमाची कथा फिरते. दिलजीत दोसांज, तापसी पन्नू आणि अंगद बेदी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा सूरमा या अनाम हॉकीपटूला न्याय देतो. सूरमा प्रेक्षकांना ध्येयपूर्तीच्या वाटेतील अडथळ्यांवर मात करायला शिकवतो.

गोल्ड

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे पहिले सुवर्णपदक भारताने पटकावले त्याची गोष्ट सांगणारा गोल्ड २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. अक्षयकुमार, मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित सध आणि विनीतकुमारसिंह या कलाकारांनी मुख्य भुमिका साकारली आहे. रीमा कागती दिग्दर्शित गोल्ड प्रसिद्धीपासून दूर राहिलेली ही कर्तृत्वाची कथा अत्यंत प्रभावीपणे मांडतो.

बुधिया सिंग: बॉर्न टू रन

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बुधिया सिंग: बॉर्न टू रन मध्ये मनोज वाजपेयी, मयूर पटोले, तिलोत्तमा शोम, छाया कदम आणि श्रुती मराठे मुख्य भूमिकेत दिलसे होते. सौमेंद्र पाधी दिग्दर्शित या सिनेमात भुबनेश्वर मध्ये राहणाऱ्या एका गरीब बुधिया सिंग ७ तास 2 मिनिटात ६५ किलोमीटर धावण्याचा इतिहास कसा रचला याची गोष्ट सांगितली आहे.  

 अजहर

दिग्दर्शक टोनी डिसूजा यांनी वादग्रस्त क्रिकेटपटू अजहरुद्दीन वर बनवलेला हा बयोपिक २०१६ साली प्रक्षाकांसमोर आणला. अजहर हा सिनेमा मोहम्मद अजहरुद्दीनच्या क्रिकेट तसेच वैयक्तिक आयुष्यातील संवेदनशील घटनांचा मोगोवा घेतो. इमरान हाशमी, प्राची देसाई, नरगिस फाखरी, कुलभूषण खरबंदा, कुणाल रॉय कपूर आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत दिसले होते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *