मुंब्रा रेतीबंदरात अजून एक मृतदेह आढळून आला

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई :  मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेले वाहन आढळून आले होते. या वाहनाचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदरात आढळून आला होता. आज त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्रातील खाडी किनारी भागात हा मृतदेह आढळून आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

 शेख अब्दुल सलीम असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे. शेख अब्दुल सलीम हा मुब्रा रेतीबंदर भागात राहायला होते असे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले होते. घातपात आहे की दुसरे काही याबाबत पोलीस पुढचा तपास करत आहे.

मनसुख हिरेन प्रकरण काय आहे

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर २७ फेब्रुवारीला स्फोटके भरलेले वाहन पार्क करण्यात आले होते. तपासानंतर ते वाहन ठाण्यातील व्यापरी मनसुख हिरेन यांचे असल्याचे समोर आले होते. ५ मार्च रोजी त्यांचा मृतदेह  मुंब्रा रेतीबंदरात आढळून आला होता. ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास ATS करत आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *