ठाकरे सरकारला अजून एक झटका

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

अजून एक तपास NIA कडे

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक आढळल्या प्रकारात रोज नवीन खुलासे होत आहे. त्यातच या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. या दरम्यान या प्रकरणाचे तपास अधिकारी सचिन वाझे हेच आरोपी झाले आहे. आता मनसुख हिरेन प्रकरण सुद्धा NIA कडे गेल्याने ठाकरे सरकारला मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

            मनसुख हिरेन प्रकारात कालच ATS ने जणांना अटक केली आहे. त्यात एक जण निलंबित पोलीस करण्चारी आहे तर एक जण क्रिकेट बुकी असल्याचे समोर आले आहे. आता मात्र, हे प्रकरण सुद्धा NIA कडे गेले आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संशय सुद्धा सचिन वाझे यांच्याकडे जात आहे. ATS ने अटक केलेल्या दोघेही सचिन वाझे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

केस NIA कडे जाण्याची कारणे:

  • स्फोटक सापडल्यानंतर हे प्रकरण क्राइम ब्रांच किवा ATS कदर जायला हव होत. ही केस क्राइम इंटेलीज्यंस युनिट देण्यात आले.
  • विधानसभेत विरोधी पक्षनेते यांनी सादर केलेले पुरावे. सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची लपवून ठेवेलेली ओळख
  • NIA कडे सचिन वाझे यांना चौकशीसाठी बोलवण्यापूर्वीच पुरावे जमा करून ठेवले होते.
  • या प्रकारात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त यांना चौकशीसाठी NIA बोलावणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती.
  • अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन लावणे आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू एक एकमेकांची निगडीत होते.

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *