|

अण्णा हजारेंनी राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे केले कौतुक

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नगर: समाजकार्यापायी स्वतःच्या कुटुंबाकडेही लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रार आमदार निलेश लंके यांच्या पत्नीकडून केली जाते. आमदार निलेश लंके यांचा हा त्याग मोठा आहे. समाजकाऱ्यांच त्यांना वेड लागलं आहे. त्यांच जिवन चरित्र कोणी लिहिलं तर मी त्याचा संपूर्ण खर्च देईल असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. आमदार निलेश लंके यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त आमदार निलेश लंके यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशिर्वाद घेतले. त्यावेळी हजारे यांनी लंके यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. अण्णा हजारे म्हणाले, आज वाढदिवस आहे म्हणून नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या निलेश लंके यांना शुभेच्छा आहेत.

राज्यात अनेक आमदार आहेत. मात्र मी आमदार निलेश लंके यांच्या पाठीशी उभा राहतो याचे कारण त्यांचे तसे समाजपयोगी काम आहे. सामाजिक, राष्ट्रीय भावनेतून ते जे काम करतात ते महत्वाचं आहे. प्रत्येक आमदाराने निलेश लंके यांच्याप्रमाणे काम केले तर तो तालुका देशामध्ये उठून दिसेल. आमदार निलेश लंके यांना मी अनेक वर्षांपासून पाहतोय. त्यांचे चारित्र, आचार, विचार हे शुद्ध आहेत जिवन निष्कलंक आहे. ते कुटुंबाकडे लक्ष देत नसल्याची तक्रार त्यांची पत्नी नेहमीच करते. त्यांचा हा त्याग आहे. असे काम करायला वेड लागावे लागते. असेही अण्णा हजारे म्हणाले.
   

काही लोक अर्धवेडे झोलेले आहेत. हा माणूस मात्र समाजहितासाठी संपूर्ण वेडा झालेला आहे. जेवण नाही, झोप नाही समाजहितासाठी सारखा प्रवास याचा अनुभव संपूर्ण राज्यातील जनता घेत आहे. त्यांचे जीवन चरित्र लिहीले गेले तर ते अनेकांना प्रेरणादायी ठरेल. चरित्र लिहून प्रसिद्ध करण्यासाठीचा खर्च मी करेल. त्यांच्या पाठीशी माझ्या नेहमीच शुभेच्छा राहतील असे हजारे यांनी सांगितले. दरम्यान आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदार संघात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *