आण्णा हजारे पुन्हा मैदानात

देशभर कार्यकर्त्याची फळी तयार करणार
अहमदनगर: समाजसेवक आण्णा हजारे बऱ्याच दिवसांपासून अलिप्त होते. आता पुन्हा एकदा आण्णा हजारे परत कामाला लागले आहेत. त्यांनी आता देशभर कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचा संकल्प सिद्धीस नेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी चारित्र्यशील कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांनी त्यासाठी अण्णांशी १० मार्चपर्यंत संपर्क करावा असेही सांगण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांच्या मार्फत आंदोलन करून सरकारवर दबाव आणण्याचा आण्णा प्रयत्न करणार आहेत. आण्णा हजारे यांनी मागे शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारच्या विरोधात पुकारकलेले आंदोलन मागे घेतल्यामुळे त्यांच्यावर सगळ्या बाजूने टीका झाली आहे.
यावेळी आण्णा हजारे म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात लोकशाही नांदेल असं सर्वांना वाटले होते पण प्रत्यक्षसात मात्र तसे काही घडून आलेच नाही. नागरिकांच्या सत्तेसाठी जी लोकशाही येणे गरजेचे समजले जात होते ती लोकशाही न आल्यामुळे सरकार त्यांना हवे तसे राज्य करत आहे. सरकार कोणत्याही पार्टीचे असले तरी त्यांच्यावर लोकांचा दबाव असणे गरजेचं आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे बळ वाढवण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.