पुढील नंबर अनिल पराबांचा? चंद्रकांत पाटील यांचे सूचक ट्विट

पुणे: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी NIA लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडी सरकार मधील ३ मंत्र्याचे नाव घेतले आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला ट्विट करून अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का? असा खोचक सवाल विचारला आहे.
सचिन वाझे यांनी शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परब यांनी भेंडी बाजार येथील सैफी बुर्हानी ट्रस्टतर्फे सुरु असलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट चौकशी करावी आणि वाटाघाटी करावी आणि माझ्या समोर आणावे. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करून घे, असे मला शासकीय बंगल्यावर बोलावून सांगितले. असा खळबळजनक आरोप वाझे यांनी केला आहे.
तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी “आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्याचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ कोटीं रुपयांची खंडणी मागितली होती. असा दावा सचिन वाझे यांनी NIA लिहिलेल्या पत्रात केला आहे.
दोन दिवसापूर्वीचअनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला ट्विट करून अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का ?असा खोचक सवाल विचारला आहे.