अनिल देशमुख यांची होणार चौकशी
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री यांच्यावर आरोप केले होते. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप केला होता. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणार आहे. महा विकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः माझी चौकशी करा अशी मागणी केली होती.
गृहमंत्र्यानी घेतलेल्या भूमिके नंतर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
गेल्या महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळून आले होते.त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. दररोज नवीन खुलासे बाहेर येत आहे. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यानंतर नाराज परमबीर सिंह यांनी मुख्मंत्र्यांकडे पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा आरोप केला होता.
मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 24, 2021
सत्यमेव जयते… pic.twitter.com/f2oJjFhO8A
या नंतर विरोधक आक्रमक झाले आहे तर परमबीर सिंह हे न्यायालयात गेले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करावी अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलीओ रिबेरो यांच्या मार्फत चौकशी करावी असे मत व्यक्त केले होते. मात्र रिबेरो यांनी ती मागणी फेटाळून लावली.