आंध्रप्रदेश राज्य सरकार आले मदतीला धावून; महाराष्ट्राला देणारं ३०० व्हेंटिलेटर

नागपूर : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पाहता रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता जाणवत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा राज्याला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या मदतीला आंध्रप्रदेश राज्य सरकार धावून आले आहे.
महराष्ट्राला मदत करावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांना केली होती. याला प्रतिसाद देत जगमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर देण्याची घोषणा केली आहे.
नितीन गडकरी यांनी मानले आभार
केंद्रीय मंत्री नितीन यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परीस्थिति बद्दल आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी बातचीत केली होती. यावेळी त्यांनी राज्याला व्हेंटिलेटर कमी पडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर देण्याची घोषणा केल्याची माहिती नितीन गडकरी यांनी ट्वीट करून दिली आहे.
Andhra Pradesh CM announces that they will send 300 Ventilators to Maharashtra. This after Union Union Minister Shri @nitin_gadkari ji spoke to CM @ysjagan with the request.
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) April 23, 2021
महराष्ट्रातील अनेक शहरात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने कोरोनाने गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अजूनही पुणे, मुंबई, नागपूर शहरात व्हेंटिलेटरची प्रचंड मागणी आहे. गंभीर आजरी रुग्णांना या व्हेंटिलेटर फार मोठी मदत होणार आहे.