…आणि त्यांचा मनसेच्या शाखेतच उरकला विवाह

मुंबई : लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ. मात्र, कोरोना महामारीमुळे अनेकांना आपल्या लग्नाच्या इच्छेला मुरड घालावी लागत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे उपस्थित राहणाऱ्यासाठी सुद्धा मर्यादा आली आहे. मात्र या सर्वावर मात करत भांडुप येथील इच्छुक दाम्पत्याचा विवाह सोहळा मनसे शाखेतच पार पडला आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आले आहेत. अशावेळी लग्नसमारंभला केवळ २ तासांची परवानगी देण्यात आली आहे आणि उपस्थित राहणाऱ्यावर मर्यादा आली आहे. नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामुळे अनेक मंगलकार्याल, हॉल बंद ठेवण्यात आले आहे. अशा वेळी अगोदरच लग्नाचे मुहूर्त ठरविले आहे त्यांची मोठी तारांबळ उडत आहे. एका विवाह इच्छुक दाम्त्याच्या मदतीला मनसेची भांडुपमधील शाखा धावून आली आणि शाखाध्यक्षांनी पक्षाच्या शाखेतच सोहळ्याची व्यवस्था केली व विवाह पार पडला.
विवाहसोहळा ठरला होता पण टाळेबंदीच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय उपलब्ध झालं नाही. मुंबई-भांडुपमधील वधु-वर कुटुंबीयांनी पक्षाच्या शाखेशी संपर्क साधला. मग काय शाखाध्यक्षांनी पक्षाच्या शाखेतच सोहळ्याची व्यवस्था केली व विवाह संपन्न झाला… मनसे जनतेच्या प्रत्येक प्रसंगात धावून जाते! pic.twitter.com/ck3x5OMvIg
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 30, 2021
याबाबत मनसेनी ट्वीटर माध्यामतून माहिती दिली
‘विवाहसोहळा ठरला होता पण टाळेबंदीच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय उपलब्ध झालं नाही. मुंबई-भांडुपमधील वधु-वर कुटुंबीयांनी पक्षाच्या शाखेशी संपर्क साधला. मग काय शाखाध्यक्षांनी पक्षाच्या शाखेतच सोहळ्याची व्यवस्था केली व विवाह संपन्न झाला… मनसे जनतेच्या प्रत्येक प्रसंगात धावून जाते!’