…आणि रॉयल इंडियन नेव्हीच्या ‘तलवार’ने ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले.

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दुसऱ्या महायुद्धाची रणधुमाळी चालू असताना १९४२ साली पूर्वेकडे रासबिहारी बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून स्वातंत्र्यासाठी लष्करी संघर्ष केला. त्याचा इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणावर आणि हिंदी लोकांच्या स्वातंत्र्य चळवळीवर दूरगामी परिणाम झाला. एकूणात आझाद हिंद सेनेच्या तेजस्वी कामगिरीचा परिणामी इंग्रजांच्या हिंदुस्थानातील लष्करावर ही झाल्याशिवाय राहिला नाही. १९४६ मध्ये इंग्रजांच्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ मध्ये जे बंड झाले तो या भावनेचाच परिपाक होता.

प्रत्यक्ष बंडाची ठिणगी पडण्यापूर्वी नौदलात स्वतंत्र प्रेमाचे वारे वाहू लागले होते. मुंबई बंदरात रॉयल इंडियन नेव्हीचा अनेक नौका नांगरून उभ्या होत्या. ‘तलवार’ ही त्यापैकीच एक प्रसिद्ध लढवू नौका होती. यान नौके वरील सैनिकांच्या एका गटाने आझाद हिंद चळवळ नावाची गुप्त संघटनाही स्थापन केली होती. संघटनेच्या नावावरून त्यांनी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेने पासून प्रेरणा घेतली होती.

१ डिसेंबर १९४५ हा नौदल दिन म्हणून साजरा होणार होता. त्यादिवशी तलवार या नौकेचे भेट देण्याचे निमंत्रण मुंबईतील अनेक प्रतिष्ठित नागरिकांना दिलेले होते. अशा प्रसंगी आपल्या मनातील इंग्रजांविषयीचा द्वेष उघड करण्याचे ‘तलवार’ वरील नौदल सैनिकांनी ठरवले. त्यांनी अत्यंत गुप्तपणे नौकेचा भिंतीवर मोठ्या मोठ्या अक्षरात ‘भारत छोडो,’ ‘साम्राज्यवादाचा धिक्कार असो,’ अत्याचार बंद करा,’ ‘ब्रिटीशांना ठार करा’ या घोषणा रंगवल्या. पाहताच गोऱ्या नौदल अधिकाऱ्यांना धक्काच बसला. चौकशी सुरू झाली.  दुसऱ्या दिवशी ‘तलवार’ला लष्करप्रमुखांच्या भेटी होत्या. त्याही दिवशी या घोषणा नव्याने लिहिलेल्या आढळल्या. परिणामी गोऱ्या अधिकाऱ्यांनी नौकेवरील पहारा कडक करून खास गुप्तहे्रांकडून चौकशी सुरू केली. बी. सी. दत्त या नौदल सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे सर्व घडून आल्याचे स्पष्ट झाले.

परिणामी दत्त यांना अटक करण्यात आली पण हा प्रकार बाहेर येऊ शकला नाही. गोर्‍या अधिकाऱ्यांनी या प्रक्षोभक घटनेविषयी अत्यंत गुप्तता पाळली होती, पण नौदल सैनिक स्वस्थ बसलेले नव्हते. १८ फेब्रुवारी १९४६ हा दिवस त्यांनी उठावाचा दिवस म्हणून निश्चित केला होता. त्या दिवशी ‘तलवार’वरील नौदल सैनिकांनी भूख हरताळ पुकारून संप सुरू केला. रॉयल इंडियन नेव्ही असा प्रकार कधीच घडला नव्हता. त्यामुळे गोरे अधिकारी चक्रावून गेले. त्यांची धावपळ सुरू झाली. नौदलातील अधिकारी रियर अॅडमिरलचे नौकेवर तातडीने आले आणि त्यांनी संपवाल्यांशी चर्चा केली. पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की हा संपूर्ण राजकीय उद्दिष्टांनी केला गेला आहे.

सायंकाळी नौदल सैनिकांनी एका संप समितीची स्थापना केली. समितीने तयार केलेल्या मागणी पत्रकात सुधारित सेवाशर्ती व चांगला अन्न पुरवठा या मागण्या बरोबर आझाद हिंद सेनेतील सैनिकांसह हिंदुस्थानातील सर्व राजबंद्याची सुटका करावी. इंग्रजांनी हिंदुस्थान सोडून जावे अशा क्रांतिकारी मागण्याही केल्या गेल्या होत्या. मुंबईतील या बंडखोर नौदल सैनिकांचे नेतृत्व एम.एस. खान, मदन आणि दत्त हे नौदलातील तीन सैनिक करत होते. त्यांनी तलवार वरील बिनतारी यंत्रणेच्या सहाय्याने अन्य युद्धनौकांवर आपल्या सैनिक बांधवांशी संपर्क साधला. तेव्हा त्या लोकांवरील अनेक सैनिकांनी आपल्या नौका सोडून ‘तलवार’च्या दिशेने कूच केली.

आता तलवारवर उघड-उघड बंड पुकारून नौदल सैनिक मुंबईच्या रस्त्यावर पोहोचले. त्यांना पाहून लोकांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला. हजारो देश प्रेमी सामान्य लोक त्यांच्या मिरवणूकीत सामील झाले. त्यांच्या ‘इन्कलाब जिंदाबाद’ आणि ‘हिंदू-मुस्लीम एक हैं’ या नाऱ्यांनी मुंबईचे मुख्य रस्ते दुमदुमून गेले. नौदल सैनिकांनी अचानक पुकारलेला संप म्हणजे ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध बंडखोरी होती. हा उठाव पाहून इंग्रज सरकार हादरून गेले. कोणत्याही परिस्थितीत हा उठाव चिरडून टाकण्याचा त्यांनी निश्चय केला. पोलीस दल, सशस्त्र सैन्यदल यांना पाचारण केले गेले. येथून पुढे सतत चार दिवस मुंबईच्या रस्त्यांवर पोलिसांच्या गाड्या व रणगाडे घरघरत राहिले.  उठावात सामील झालेले लोक व सैन्यदल यांची धुमश्चक्री चालू राहिली. अनेक वेळा गोळीबार झाले, गाड्यांवर व शस्त्र सैनिकांवर दगड-विटांचा मारा करून आपला प्रतिकार दाखवीत असत. लोक तसे निशस्त्र होते. सरकारजवळ प्रभावी शस्त्रे व साधने होती. तथापि आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या गोळीबारात दाद न देता संघर्ष चालू ठेवला. चार दिवसांतील गोळ्या गोळीबारात एकूण २२८ जण मृत्युमुखी पडले. तरीही लोक मागे हटले नाहीत.

उठाव झालेल्या नौकांना आणि त्यांच्या बराकी नाव ऍड होऊन त्यांची रसद तोडण्याचा सरकारने निर्णय घेतला. आणि त्याच प्रमाणे त्यांच्याभोवती सशस्त्र दलातील सैनिकांचे पहारे बसविण्यात आले. पण लोकांना जेव्हा कळलं की सरकार नवोदल सैनिकांची कोंडी करून त्यांना शरण आणू पाहते आहे. तेव्हा मुंबईतील शेकडो देशप्रेमी नागरिकांनी खाद्यपदार्थांची पुढे घेऊन गेटवे ऑफ इंडियाकडे कुच केली. विशेष म्हणजे हे पुडके नवदल सैनिकांकडे पोहोचती करण्यात ते यशस्वीही झाले होते. नौदल उठावातील एक प्रमुख नेते बी. सी. दत्त यांनी या प्रसंगावर ‘म्युटिनी ऑफ द इनोसंट’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात वरील सर्व प्रसंगाचे वर्णन केले आहे. दत्त यांच्या साक्षी वरून स्पष्ट होते की भूदल सैनिकांच्या मनात ही या नवदल सैनिकांच्या उठावाबद्दल सहानुभूती निर्माणझाली होती आणि त्याचे गंभीर परिणाम बदलांवर होऊ शकत होते.

हा उठाव चालूच राहिला तर त्यातून अजून भीषण रक्तपात घडून आला असता. म्हणून राष्ट्रसभेच्या एकूण राजकीय ध्येयधोरणात बसणारी ही घटना होती. आणि मग कुणीतरी मध्यस्थी करून नौदल सैनिकांचा हा उद्रेक शमविण्यासाठी मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. सुदैवाने राष्ट्रसभेचे नेते सरदार पटेल व मुस्लिम लीगचे नेते बॅ.जिना या वेळी मुंबईत धावून आले. त्यांनी नौदल सैनिक व सरकार यांच्यात वाटाघाटी करून, “कोणीही नौदल सैनिकास शिक्षा होणार नाही व बंड करून उठल्याबद्दल कोणताही सूड उगवला जाणार नाही.” असे सरकारच्या वतीने आश्वासन दिले गेल. हे आश्वासन मिळाल्यावर रॉयल इंडियन नेव्हीमधील बंडखोर सैनिकांनी २३ फेब्रुवारी १९४६ रोजी सकाळी सरकारपुढे शरणागती स्वीकारली आणि अशाप्रकारे नौदलातील हा अभूतपूर्व उठाव शांत झाला.

यावेळी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात नौदलाच्या केंद्रीय संप समितीने म्हटले होते की, “आमच्या देश बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की, आमचा संप हा देशाच्या इतिहासातील एक अर्थपूर्ण घटना आहे.”  लष्करातील भारतीय सैनिक आणि इतर भारतीय यांचे रक्त सामाजिक ध्येयासाठी एकत्रितपणे सांडले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. लष्करी सेवेत असणारे आम्ही ही गोष्ट कधीच विसरणार नाही. आमच्या अन्य भारतीय बंधू-भगिनींना नाही त्याचा विसर पडणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे आपला महान देश चिरायू होवो! जय हिंद!


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *