राज्याला पुरेसा लसीचा पुरवठा होतोय; राज्यसरकारने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये–देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असून काही केंद्रावरून नागरिकांना परत जाव लागत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगितले आहे. यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. लसीकरणाबाबत करण्यात येत असलेले आरोप चुकीचे असून राज्यसरकार मधील मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी राजकारण आणि नागरिकांच्या जीवाशी खेळू नका अस फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा असल्याचे सांगितल्यानंतर लसीकरणाचे कसे होईल याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राज्यसरकारवर पलटवार केला आहे.
महाराष्ट्राला सर्वाधिक लसीचा पुरवठा
लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. राज्याला दिलेले टार्गेट आणि क्षमता पाहता लसीचा पुरवठा नियमित होत आहे. लसीचा देशभर पुरवठा होत आहे. देशात सर्वात जास्त लस महाराष्ट्राला मिळत आहे. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत दुसरा साठा येतो. रोजच साठा येत असतो. आपल्याला लसीची साठेबाजी करायची नाही असा टोला सुद्धा फडणवीस यांनी लगावला.
माध्यमांशी बोलण्या ऐवजी केंद्राकडे जा
लसीकरणाबाबत राज्य सरकारने राजकारण बंद करावे. भारत काही वेगळा नाही. या सगळ्या गोष्टी मीडियात करण्या ऐवजी भारत सरकारशी चर्चा करा असा सल्ला फडणवीस यांनी दिला.