|

‘शरदच्या नेतृत्वाखालीच सरकार आलं पाहिजे.’ वसंतदादांचा आग्रह होता…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

२७व्या वर्षी आमदार, ३२व्या वर्षी राज्यमंत्री, ३४व्या वर्षी मंत्री आणि ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले शरद पवार यांचा मुख्यमंत्री होण्यामध्ये आणि दादांचे सरकार पाडण्यात त्यांचा मोठा वाटा होता. परंतु, त्या दरम्यान दादा यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी फार मोठी टीका पवारांवर झाली होती त्या टीकेबद्दल पवार फारसे कुठेच बोलत नाहीत. परंतु एकमेव आपल्या चरित्रात्मक पुस्तकाच्या दरम्यान ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी जेंव्हा पवार यांची मुलाखत घेतली, आपसूकच हा ही प्रश्न तेव्हा मुलाखतीत विचारण्यात आला.

तेव्हा शरद पवार हे अगदी सरसावून १९७८ साली घडलेल्या सगळ्या घटना सांगतात. त्यांच्याच शब्दात, काँग्रेस (आय) आणि काँग्रेस (एस) यांचा संयुक्त सरकार जेव्हा महाराष्ट्रात अधिकारावर आले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. या अधिकारावर आल्या दिवसापासून त्यांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांविरुद्ध जाहीर निवेदने द्यायला त्यांनी सुरू केली. ‘नाईलाजाने सरकारात सामील झालो’ असे सांगायला सुरुवात केली आणि काम करणे अशक्य झाले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण दिल्लीत १ रेसकोर्स इथे राहत होते. तिथे बैठक झाली त्या बैठकीला वसंतदादा ही उपस्थित होते. अण्णासाहेब शिंदे होते. ‘स्वाभिमानाने हे सरकार चालविणे अशक्य आहे.’ असे दादांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्या बैठकीला बरेच जण होते. जसे की गोविंदराव आदिक, प्रतापराव भोसले, राम मेघे, सुंदरराव सोळंके, किसनविर या सर्वांनी मिळून असं ठरवलं की सरकार पाडणं आवश्यक आहे.

यशवंतरावांची मनस्थिती तीच होती. या बैठकीला गोविंदराव तळवळकर उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेख लिहिला, हे सरकार पडावे, ही श्रींची इच्छा त्या अग्रलेख आनंद सगळ्यांचे सर्रास मत झाले की, हे यशवंतराव चव्हाण यांचीच भूमिका आहे. दरम्यान काँग्रेसचे त्यावेळी चे अध्यक्ष स्वर्णसिंग (काँग्रेस एस.) यांनी बैठक घेऊन सरकार पाडू नये अशी भूमिका घेतली. त्या बैठकीला यशवंतराव चव्हाण हजर होते. पक्षाचा हा निर्णय यशवंतरावांनी मला कळवावा, असे बैठकीत ठरले. जेव्हा यशवंतरावांचा फोन मला आला तेव्हा मी रहात असलेल्या रामटेक बंगल्यावर सरकार पाडण्याबाबत आमदारांची बैठक सुरूच होती. मी यशवंतरावांचा फोन घेतला. त्याने निरोप सांगितला. माझ्या हातातून किसन वीर यांनी फोन करून घेतला आणि दरडावललेल्या आवाजात ते म्हणाले, यशवंतराव सरकार पाडण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. हे सरकार आता चालू द्यायचे नाही. दोर कापलेले आहेत. आता मागे फिरता येणार नाही. निर्णय झालेला आहे. शरद एकटा गडी आहे आणि तो लढतो आहे. आम्ही त्याच्या मागे आहोत. सरकार वाचविण्यासाठी आता तुम्ही फोन करायचा नाही.

आणि मग सरकार पडले अर्थात सरकार पाडण्याचा शिक्का मात्र शरद पवारांवर बसला. टीकाही झाली. वसंतराव पाटील दादांचे आणि शरद पवार यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे सरकार पाडण्याच्या बाबतीत शरद पवारांच्या मनाची तयारी नव्हती. पण परिस्थिती अशी तयार झाली त्यातून कृतीही पार पडली. पुढे अनेक वर्ष त्यांनी टीका सहन केली. आजतागायत… यशवंतरावांचा सरकार पाडण्याचा पाठिंबा होता परंतु ते उघडपणे बोलत नसायचे. परंतु एकदा कराडला भाषण करताना ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारात कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यासारखे वाटते आहे.त्यांच्या या एका वाक्याने जो मेसेज कार्यकर्त्यांमध्ये जायचा होता तो गेला. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर जमा यशवंतरावांना विचारायला गेले की, ‘मुख्य सचिव कोणाला करावे?’ तेव्हा ते म्हणाले हा अधिकार फक्त मुख्यमंत्र्याचाच आहे. आणि मग पवारांनी निर्णय घेतला. राज्याचा पहिला दलित मुख्य सचिव श्री.पी.जी गवई यांची नियुक्ती केली. ती योग्य नियुक्ती होती. पुढे हे सरकार दीड वर्ष काम करीत होते. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे महागाई भत्ता देण्याचा निर्णयही शरद पवारांनी घेतला.

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना राज्य कर्मचाऱ्यांनी ५४ दिवसांचा संप केला होता. त्यांची ती मागणी वाजवी होती, म्हणून निर्णय करावा लागला. हे पू. लो. द चे सरकार चालवत असताना, सुरुवातीला उत्तमराव पाटील, निहाल अहमद, गणपतराव देशमुख, सुंदरराव सोळंके, अर्जुनराव कस्तुरे अशा पाच जणांच्या मंत्री मंडळासह काम सुरू केले. विधानसभेच्या अधिवेशनात समोर प्रतिभाताई पाटील विरोधी पक्षनेत्या होत्या. तसेच श्रीमती प्रभा राव, यशवंतराव मोहिते असे तगडे विरोधक दादांचे सरकार पाडले म्हणून त्यांचा राग पवारांवर होता. ती अधिक आक्रमक होते आणि शरद पवारांचे पाचही मंत्री तसे नवेच होते. सुंदरराव सोळंके यांना सोडले तर. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासापासून सर्व लक्षवेधी उत्तरे, सगळ्या चर्चा संध्याकाळपर्यंत सर्व विषय पवार यांनी, स्वतःच्या अंगावर घेऊन सभागृहाला सामोरे गेले होते.

पवार सांगतात की, वसंत दादा पाटील यांचे सरकार पडल्यानंतर टीकेचा शिक्का माझ्यावर बसला हे मी मान्य करतो. दादांची आणि माझे कौटुंबिक संबंध होते त्यात दुरावा निर्माण झाला पण वसंतदादांनी मोठ्या मनाने १९८६ साली शरदच्या नेतृत्वाखालील सरकार आले पाहिजे असा आग्रह धरला. दादा मनाने खरोखरच मोठे नेते होते! शरद शिवाय हे राज्य कोणीही चालू शकणार नाही.” असे म्हणत वसंतदादांनी मनःपूर्वक पाठिंबा दिला होता.

पुढे मंत्रिमंडळाची वाढ करताना एस.एम. जोशी यांनी श्री. शंकरराव यांचे नाव सुचविले. मोरारजी भाईंनी ते ताबडतोब मान्य केलं. मोरारजी पंतप्रधान होते. त्याच वेळी शंकरराव चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यायचे ठरले. पवार यांनी म्हटले की, ‘त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो, आता ते माझ्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कसे येतील?’ त्यावर मोरारजीभाई म्हणाले, ‘नक्कीच येतील’. आणि ते आले देखील. परंतु, दुसरे संभाव्य मंत्री राजाराम बापू पाटील यांना मंत्री करण्यास मोरारजीभाई यांनी विरोध केला. ‘राजारामबापू निवडणुकीत पराभूत झाले आहेत,’ असे कारण मोरारजींनी दिले. एस. एम. जोशी यांचा आग्रह होता. पण मोरारजींच्या विरोधामुळे बापूंना सुरुवातीला घेता आले नाही. मोरारजी यांच्या घरातून, शरद पवार आणि एस एम जोशी बाहेर पडले, तेव्हा एस एम जोशी म्हणाले, ‘लेकाचा बापू पडले म्हणून सांगतोय. हा स्वतः बलसाड मतदारसंघात आमच्या डॉ. अमोल देसाई कडून पराभूत झाल्यावर मुख्यमंत्री झाला नव्हता का?’ जोशींच्या बिनतोड प्रश्नाचे शरद पवारांकडे उत्तर नव्हते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *