|

आणि विरोधी पक्ष नेते संतापले…

And opposition leaders were outraged
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते आक्रमक झालेलेल दिसून येत आहे. विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची टिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी करत सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा दिला. खास करून यावेळी गदारोळ घालणाऱ्या सदस्यांकडे पाहून ‘ए काय रे…’ अस म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला. सद्या विधिमंडळातील कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे.

पुढे फडणवीस बोलतांना म्हणाले,” तुम्हाला संधी देतो अस तुम्ही सांगू शकता. पण तुम्ही पाहतच नाही. सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते असून ते बऱ्याच वेळापासून उभे आहेत पण तुम्ही त्यांच्याकडे पाहतच नाही. अस रेटून आणि आमच्या अधिकारांच हनन होणार असेल तर कशाला आम्हाला बसवता. सरळ बाहेर पाठवा,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. यावेळी अधिवेशनात गदारोळ सुरु असतांना सत्ताधारी पक्षातील आमदारांना फडणवीसांनी ए काय रे असा आवाज चढवताच परत गदारोळ सुरु झाला.

“सभागृहात कस वागायचं हे शिकवा यांना… आपण विरोधी पक्षाकडे लक्ष दिल पाहिजे याठिकाणी आमचा हक्क आहे. आमच्याकडे असलेल्या अधिकारांच हनन होणार असेल तर आम्ही क्षणभर सुद्धा बसणार नाही.” असही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *