पुढे पहा आणखी काय होते; राज्य सरकारला कंगनाचां इशारा

मुंबई: कंगना राणौत आपल्या मनातील विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम ठेवत आली आहे. २०२० मध्ये कंगनाने सोशल मीडियावरून महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले आहेत. हे सगळं घडल्यानंतर अनिल देशमुखांनी,”कंगनाला येथे राहण्याचा अधिकार नाही ” असं वक्तव्य केलं होतं. आता अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर कंगना राणौतने त्यांना उपदेश दिले आहेत.
१०० कोटींच्या वसुली प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, अनिल देशमुख यांनी आताच आपला राजीनामा दिला आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज राजीनामा दिल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौतने ट्विटरच्या माध्यमातून अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे.
कंगनाच्या एका चाहत्याने सप्टेंबर २०२० मधील कंगनाच्या व्हीडिओला ट्विट केला आहे, हा व्हीडिओ त्या वेळेचा आहे जेव्हा बीएमसीने कंगनाच्या ऑफिसची तोडफोड केली होती. त्यावर चाहत्याने कंगनाला सपोर्ट केला आहे. यानंतर कंगनाने त्या व्हीडिओला रीट्विट करत, महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधलाय.
तिच्या सपोर्टसच्या ट्ववीटला रिट्वीट करून कंगनाने म्हटलं आहे, “साधूंना ठार मारणाऱ्यांचा आणि स्त्रीचा अपमान करणार्यांचा अंत निश्चित आहे. पुढे पाहा आणखी काय काय घडतं ते.” हे वाक्य तिने अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांना ही टॅग करून लिहिले आहे.
कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. यावर यूझर्स देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
जो साधुओं की हत्या और स्त्री का अपमान करे उसका पतन निश्चित है #AnilDesmukh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 5, 2021
यह तो सिर्फ़ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या #UddhavThackeray https://t.co/cvEZsjUxSc