पुण्यात सलग पाचव्या दिवशी कोरोना बाधीतांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या घटली आहे. शहरात आता ५० हजार ३३५ रुग्ण उपचार घेत आहे. तर उपचारानंतर ३ लाख ३४ हजार ७८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी (आज) पुणे शहरात ४ हजार ४६५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहे तर उपचारांना नंतर ५ हजार ६३४ जनांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात सलग पाचव्या दिवशी कोरोना बाधीतांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. काही दिवसापूर्वी पुणे शहर आणि परिसरात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते.
गेल्या पाच दिवसापासून बाधितांन पेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
दिनांक कोरोनामुक्त नवे रुग्ण
- २३ एप्रिल ५६३४ ४४६५
- २२ एप्रिल ४८५१ ४५३९
- २१ एप्रिल ६५३० ५५२९
- २० एप्रिल ६८०२ ५१३८
- १९ एप्रिल ६४७३ ४५८७
पुण्यात आजची स्थिती
२३ एप्रिल
- दिवसभरात ४४६५ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ५६३४ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ८० रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १३२८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३९१४९५.
- ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५०३२५.
- एकूण मृत्यू -६३८८.
- आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३३४७८२.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२९६२.
#GoodNews : सलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्त अधिक संख्येने !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 23, 2021
■ दिनांक/कोरोनामुक्त/नवे रुग्ण
◆ २३ एप्रिल /५६३४/४४६५
◆ २२ एप्रिल/४८५१/४५३९
◆ २१ एप्रिल/६५३०/५५२९
◆ २० एप्रिल/६८०२/५१३८
◆ १९ एप्रिल/६४७३/४५८७
आता नको कोणतीही ढिलाई,
बाकी आहे मोठी लढाई !#PuneFightsCorona