आमिर खानच्या घटस्फोटावर हिना खानची प्रतिक्रीया घेतीये सगळ्यांचं लक्ष वेधून

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास १५ वर्ष किरणसोबत संसार केला. परंतु हा १५ वर्षांचा प्रवास अखेर थांबला. कारण त्यांनी घटस्फोट घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. घटस्फोटाची बातमी समोर येताच अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी टीका दोघांवर टीका केली तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. परंतु यामध्ये अभिनेत्री हिना खान हिने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिनं दोघांचंही कौतुक केलं आहे.
“किरण आणि आमिर या दोघांचाही मी सन्मान करते. त्यांनी घेतलेला निर्णय गोग्य की अयोग्य हे त्यांनाच अधीक ठावूक आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी हे प्रकरण हाताळलं ते नक्कची कौतुक करण्याजोगं आहे. सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट काळातून जावं लागतं. जेव्हा नाटक संपतं तेव्हा परिपक्वता सुरू होते.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करत हिनाने आमिर-किरणचे कौतुक केले.
आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे. आमिर-किरणचा १५ वर्षांचा संसार मोडल्याने चाहत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘या १५ सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे. आम्हाला आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे. आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून.’


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *