आग विझवून घरी निघालेल्या अधिकाऱ्याचे अपघाती निधन
पुणे: पुण्यातील फॅशन स्ट्रीटला लागलेली आग विझवून घरी जात असतांना अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. प्रकाश हसबे असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाचे प्रमुख होते.
पुण्याच्या कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती. ही आग रात्री १ च्या सुमारास लागली होती. साधारण ३ वाजण्याचा दरम्यान ही आग आटोक्यात आली. त्यानंतर प्रकाश हसबे हे घरी जाण्यास निघाले. पहाटे घरी जात असतांना येरवड्या जवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी मध्य रात्री १ च्या सुमारास आग लागली ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. आग आटोक्यात यावी यासाठी अग्निशामक दलाचे १० अधिकारी ५२ जवान, १६ गाड्या यात सामील झाले होते. फॅशन स्ट्रीट मधील तब्बल ८०० दुकाने जळून खाक झाली आहेत. यामुळे व्यापाऱ्याचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. फॅशन स्ट्रीटचा भाग अरुंद असल्याने ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र आग विझवून घरी जाणाऱ्या अधिकाऱ्याचे अपघाती निधन झाले.