Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचा'नॉटी जमात' असं म्हणत अमृता फडणवीसांचं ट्वीट, ठाकरे सरकारवर साधला निशाणा !

‘नॉटी जमात’ असं म्हणत अमृता फडणवीसांचं ट्वीट, ठाकरे सरकारवर साधला निशाणा !

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शन साठा पुरवठ्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आता या वादात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. ‘नॉटी जमात’ प्राण वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांच्या जीवावर उठली आहे, अशी टीका केली आहे.
वांगणी रेल्वे स्थानकावर पॉइंटमन मयूर शेळके याने एका अंध महिलेच्या मुलाचा जीव वाचवला. हा व्हिडीओ शेअर करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘एक माणूस आपल्या जीवाची बाजी लावून एका मुलाचा जीव वाचवत आहे. तर दुसरीकडे नॉटी जमात ही जी लोकं इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचं खरं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे ‘, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.
याआधी अमृता फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्यांवरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. आताही रेमडेसीवीर इंजेक्शन पुरवठा प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर आणि केशव उपाध्ये यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा राज्यपालांकडे केली आहे.
नवाब मलिक यांनी खोटे आरोप केले त्याचे पुरावे त्यांनी दोन दिवसात सादर करावे. केंद्र सरकारविरोधात नाराजी निर्माण करणे आणि सर्वसामान्यांच्या मनात भय निर्माण करणे या कलमा अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसंच, नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments