Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचा''कोकणात तोतला आणि इथे मंगळसुत्र चोर थयथयाट करत आहेत'' - अमोल मिटकरी

”कोकणात तोतला आणि इथे मंगळसुत्र चोर थयथयाट करत आहेत” – अमोल मिटकरी

मुंबई – शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टबाबत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीमध्ये आंदोलन केलं.

त्यानंतर आज सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या मुद्द्यावरू गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं आंदोलन. या दोन्ही आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर तिखट शब्दात जोरदार टीका केली आहे.

हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सोमय्या, पडळकर आणि खोतांवर ट्वीट करत निशाणा साधला आहे.

हाय होल्टेज ड्रामेबाजाना महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे. काल कोकणात तोतला व आज इकडे मंगळसुत्र चोर जो थयथयाट करत आहेत तो थयथयाट राज्यातील हुशार तरुणाई पाहते आहे. हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे. आगामी काळात ही घाण जनताच साफ करेल.#मंगळसूत्रचोर अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

लोकांनी एखादी गोष्ट मनावर घेतली, लोकांनी कुठले काम हाती घेतले की कितीही पोलीस बंदोबस्त लावला तरी ते काम थांबत नाही. आम्ही टेन्कोलॉजीचा वापर करुन ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली आहे. आमच्या दृष्टीने लोकार्पण सोहळा पार पडला आहे अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

ताज्या बातम्या –

महाविकास आघाडीसोबत राहायचे की नाही, यावर स्वाभिमानीचा ५ एप्रिल रोजी निर्णय

चमच्यांचे हे विधान ऐकून पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल ! राऊतांचा चंद्रकात पाटलांवर हल्लाबोल

पुणे शहरात सर्वत्र समान पाणी मिळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments