रुग्णवाहिकेच्या चालकाचा पीपीई किट घालून वऱ्हाडींसोबत डान्स, व्हिडिओ तुफान चर्चेत!

Ambulance driver wearing PPE kit and dancing with brides, video storm in discussion!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

उत्तराखंड: सध्या भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची झपाट्यानं वाढ होतं आहे. देशात दिवसाला तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होतं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध तर काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊनही जाहीर करण्यात आलं आहे. असं असताना नागरिकांचा हलगर्जीपणा कमी होताना दिसत नाहीये. होम क्वारंटाइन असणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक मार्केटमध्ये बेधडक फिरताना दिसत आहे. तर दुसरीकडे लग्न संमारंभही अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. त्यामुळे देशाच्या चिंता वाढताना दिसत आहेत.
अशातचं कोव्हिड रुग्णवाहिकेचा एक चालक भर वरातीसोबत डान्स करताना दिसत आहे. रुग्णालयासमोरून लग्नाची वरात वाजत गाजत जात असताना संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने पीपीई किट परिधान करून वऱ्हाडींसोबत डान्स केला आहे. या प्रकरानंतर लग्नातील वऱ्हाडीही अवाक् झाले होते. ही घटना घडत असताना काही वेळासाठी अनेकांना काय करावं हेही सुचलं नाही.
संबंधित घटना उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी याठिकाणी घडली आहे. यावेळी लग्नाची एक वरात हल्द्वानीतील सुशीला तिवारी रुग्णालयासमोरून जात होती. दरम्यान संबंधित रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा चालक थेट पीपीई किट घालून डान्स करण्यासाठी वरातीत घुसला आहे. त्याने अशापद्धतीनं वरातीत डान्स केल्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. यावेळी वरातीत डान्स करणाऱ्या पाहुण्यांना काय करावं हेही सुचलं नाही. पण अशा पद्धतीनं रुग्णवाहिकेच्या चालकानं डान्स केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडीओ आता प्रचंड चर्चेत आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *