राज्यात आज पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद!

पुणे: राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार आता महापालिकेने नवीन निर्बंध लावले आहेत. त्यानुसार अगोदरच्या आदेशानुसार सगळे ६ वाजता बंद होणार आहे. फक्त सुरू करण्याच्या वेळेत बदल केला असून सकाळी 6 ऐवजी 7 वाजता उघडणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या आदेशात नमूद केले आहे.
हे सुरू राहणार
१)रुग्णालये, विमा कार्यालये, मेडिकल दुकाने
२) किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी आणि खाद्यपदार्थ ची दुकाने
३) अत्यावश्यक सेवेसाठी बस सुविधा
४) ई कॉमर्स
५) वृत्तपत्र
६) बँके, दूरसंचार सेवा देणारी कार्यालये, विमा कार्यालय, वकील यांची कार्यालये
७) पार्सल सुविधा देणारे
८) उत्पादन क्षेत्र,
९) बांधकाम
१०) पेट्रोल पंप
हे बंद राहणार
१) सर्व प्रकारची दुकाने, मॉल
२) सिनेमा, नाट्यगृहे, जिम, क्लब, स्विमिंग पूल
३) हॉटेल, रेस्टॉरंट, बार
४) सर्व धार्मिक स्थळे
५) केशकर्तनालय, ब्युटी पार्लर
६) शाळा, महविद्यालय
७) ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळ्यास सोसायटीला मायक्रो झोन तयार करून बाहेरील व्यक्तीला प्रवेश नसणार