|

आलियाच्या आईचा उद्धव ठाकरेंना सल्ला!

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहिम राबवली जात आहे. सध्या देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. एकीकडे दिवसागणिक हजारो नव्या रुग्णांची नोंद होत आहे तर दुसरीकडे, बॉलीवूडची चुलबुली गर्ल अर्थात आलिया भट्ट हिच्या आईनं कोरानाबाबत चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर आलियाच्या आईनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला सुद्धा दिलेला आहे.

आलियाची आई सोनी राजदान यांनी एक ट्वीट केलं आहे. सोनी राजदान यांनी कोरोनाव्हायरस आणि कोरोना लसीकरण मोहिमेबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरकारनं प्रथम १६ ते ४० वयोगटातील नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करून द्यायला हवी, असं मत सोनी राजदान यांनी व्यक्त केलं आहे. याचसाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

’१६ ते ४० वयोगटातील लोक कामासाठी घराबाहेर पडतात. नोकरी, बार,क्लब अशा ठिकाणी देखील या वयोगटातील लोकांची संख्या जास्त दिसते. तर त्यांना कोरोना लस का दिली जात नाही?’ असा सवाल उपस्थित करणारं ट्वीट सोनी राजदान यांनी केलंय. राजदान यांनी आपल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग केलं आहे. सोनी राजदान यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियात चर्चेत आहेत. राजदान यांनी दिलेल्या सल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. दूरदर्शन वाहिनीवरील ‘बुनियाद’ मालिकेत सोनी राजदान या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्याचप्रमाणे राजदान यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपटात काम केलं आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *