अजित पवारांचा लॉकडाऊन विरोध; प्रशासन म्हणते आठवडाभराचे तरी करा

पुणे: पुणे शहरा बरोबर ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. रुग्ण अधिक आढळून येत असल्याने पुण्यात एकही बेड उपलब्ध नाही. यामुळे विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने एक आठवडा लॉकडाऊन करावे अशी मागणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीला विरोध दर्शवत सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध ठेवण्यात यावे असे सांगितले.
पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील कौन्सिल ऑफ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, केंद्र सरकार कडून महाराष्ट्राला १ हजार १०० व्हेंटिलेटर पुढील ३ दिवसात मिळणार आहे. लसी बाबत राजकारण करण्यात येत नसून केंद्र सरकार लागेल ती मदत करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच कडक निर्बंधला विरोध करणाऱ्या व्यापारी महासंघा सोबत विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे बैठक घेणार आहेत. त्यावेळी त्यांना परिस्थिती बाबत जाणीव करून देण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
तसेच माध्यमातून होत होत असणाऱ्या टीकेवर त्यांनी उत्तर देत प्रशासनाला कुठलेही अपशय आले नसल्याचे सांगत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. ऑक्सीजन कमी पडणार नाही यासाठी योग्य पावले उचलण्यात येत आहे.