Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचामार खाणारी व्यक्ती अजय देवगण तर नाही? प्रवक्त्या कडून खुलासा

मार खाणारी व्यक्ती अजय देवगण तर नाही? प्रवक्त्या कडून खुलासा

मुंबई: काल रात्रीपासून सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याच्या कथित मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

किसान आंदोलनाला पाठिंबा न दिल्याबद्दल काल रात्री दिल्लीतील एका पबच्या बाहेर काही जणांनी अजय देवगण  यांना बेदम मारहाण केली असे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी व्हिडिओच्या आधारे सोशल मीडियावर ही व्यक्ती दुसरं तिसरं कुणीही नसून  अजय देवगणच असल्याचे तर्क लावले जात होते.

हा व्हिडीओ दिल्लीचा आहे आणि देवगण गेल्या एक वर्षापासून दिल्लीला गेले नाहीत असं म्हणत अजय देवगणच्या प्रवक्त्याने हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. अजय देवगणच्या प्रवक्त्याने सांगितले की, २०२० नंतर तान्हाजी – द अनसंग वॉरियर चित्रपटाच्या प्रमोशननंतर अजय देवगण दिल्लीला गेले नाहीत. त्यामुळे दिल्लीतील एका पबच्या बाहेर झालेल्या चकमकीशी संबंधित बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही. यासोबतच त्याने सांगितले की, अजय देवगण सध्या आपल्या टीमसोबत मुंबईत मैदान, मेडे आणिगंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून  गेल्या १४ महिन्यांपासून ते दिल्लीला गेले नाहीत.

एका ट्विटर वापरकर्त्यानं या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पांढरा शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीला मारहाण केली जात आहे. संबंधित व्हिडीओ पोस्ट करताना या वापरकर्त्यानं लिहिलं की – ‘तो अजय देवगण आहे की नाही हे मला माहिती नाही. पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मार खाणारी व्यक्ती अजय देवगण आहे असा दावा केला जात आहे.’

व्हायरल व्हिडीओ

देशाची राजधानी दिल्लीत काल मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला आहे. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना चांगलाचं चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतं असताना असा दावा केला जात आहे की, संबंधित मार खाणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments