Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचाविधीमंडळात चर्चा होईपर्यंत कृषीपंप व घरगुती वीज तोडणार नाही

विधीमंडळात चर्चा होईपर्यंत कृषीपंप व घरगुती वीज तोडणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई: शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यावेळी वीजबिला बाबत बोलताना म्हणाले, “सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो, जोपर्यंत वीजबिलाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आणि घरगुती वीज तोडणं थांबवावे. आज राज्यपालांच्या अभिभाषनावर चर्चा होणार आहे. त्त्यामुळे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात यावी. सगळ्या सदस्यांच समाधान झाल्यावर वीज बिल संबंधित मुद्द्यांवर निर्णय घेण्यात येईल,” अस अजित पवार यांनी स्पष्ट केल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments