दहावी, बारावी नंतर आता ‘या’ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत

Amit Deshmukh instructs MSEDCL not to have power outage during Corona period
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

१९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी होत असतांना अमित देशमुख यांनी ७२ तासात निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

अमित देशमुख यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितले कि, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलणेबाबत बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे.

कोरोना वाढत असल्याने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या अशी मागणी होत होती. यानंतर अमित देशमुख यांनी ७२ तासात निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिली होती.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *