कुंभमेळ्यातून परतल्यानंतर त्यांना कोरोना झाला होता, श्रवण राठोड यांच्या मुलाचा खुलासा

After returning from Kumbh Mela, he had a corona, Shravan Rathore's son revealed
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : नदीम- श्रवण यांच्या जोडीने नव्वदचा काळ गाजवलाय. यांनी अनेक सुपरहिट संगीत दिले आहेत. या जोडीने आशिकी, साजन तसेच आमिर खानचा राजा हिंदुस्तानी आणि शाहरुख खानचा परदेस या चित्रपटात सर्वोत्तम संगीत दिलं आहे. ही गाणी आजही आवर्जून ऐकली जातात. २००० मध्ये विभक्त झाल्यानंतर परत २००९ मध्ये डेविड धवन यांच्या ‘डू नॉट डिस्टर्ब’ साठी त्यांनी संगीत दिलं होतं.
नुकतंच या प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम – श्रवणमधील श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. कुंभमेळ्यातून परतल्यानंतर त्यांना कोरोना झाला होता, असा खुलासा त्यांचा मुलगा संजीवने केला आहे.
श्रवण हे ६६ वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईच्या माहीम मधील एस.एल. रहेजा या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार श्रवण हे काही दिवसांपूर्वी हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथून मुंबईला परतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती.
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्वतः श्रवण यांचा मोठा मुलगा संजीवने ही माहिती दिली आहे. एबीपीशी बोलताना संजीव यांनी म्हटलं होतं, माझे बाबा हरिद्वारला कुंभमेळ्यामध्ये दर्शनासाठी गेले होते आणि तिथून आल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती आणि खूपच अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे आम्ही त्यांना एस.एल. रहेजा या रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचबरोबर त्यांच्या शरीरातील काही भाग काम करत नसल्याचंही समोर आलं होतं. शेवटी या सर्व आजारांच्या विळख्याने त्यांचं निधन झालं.
” बाबांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर माझी, माझा भावाची आणि आईचीसुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये माझ्या भावाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र माझा आणि आईचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता “, असं संजीवने सांगितलं.
श्रवण यांच्या मोठ्या मुलावर आणि पत्नीवर मुंबईच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर छोटा मुलगा दर्शन घरीचं आयसोलेशनमध्ये आहे. श्रवण राठोड यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *